Sensex Update: भारतीय शेअर बाजारात आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरलाय. परदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्यानंतर बाजार मोठ्या घसरण पाहायला मिळाली. एका वेळी तर सेन्सेक्स 57 हजार आणि 17 हजाराच्या खाली घसरला होता. पण आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 1 हजार 687 अंकांनी घसरून 57 हजार 107 वर गेला. तर, निफ्टी 510 अंकांच्या घसरणीसह 17 हजार 026 वर बंद झाला.  


दरम्यान आज सकाळपासूनच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 541 अंकांनी घसरण होऊन 58 हजार 254.79 अंकांवर सेन्सेक्स सुरू झाला. 
त्यानंतर सेन्सेक्स 1 हजार 109 अंकांनी घसरुन 57 हजार 727.520 अंकावर गेला होता. निफ्टीमध्ये जवळपास 350 अंकाची घसरण दिसून आली.  


हेल्थ सेक्टरसोडून सर्वच क्षेत्रात घसरण


शेअर बाजारात आज हेल्थ सेक्टर शिवाय कोणतेही क्षेत्र वाढ झालेली दिसली नाही. ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, मेटल, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एनर्जी यासह रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागातही मोठी घसरण झाली.


आजचे टॉप शेअर्स


- सिप्ला 7.42 टक्क्यांनी वाढून 966.70 रुपयांवर पोहचलंय.
- डॉ रेड्डीज लॅब्स 3.47 टक्क्यांनी वाढून 4750 रुपयांवर पोहचलंय.
- डिव्हिस लॅब्स 2.88 टक्क्यांनी वाढून 4750 रुपयांवर पोहचलंय.
- नेस्ले 0.23 टक्क्यांनी वाढून 19,222 रुपयांवर पोहचलंय.


दरम्यान बाजारातील या घसरणीमुळे अवघ्या शुक्रवारी दिवसभरात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.48 लाख कोटी रुपयांची घसरण झाली. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा, परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री आणि रोखे उत्पन्नात घट ही शेअर बाजार घसरण्याची प्रमुख कारणे आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-