UPSC Toppers Interview : UPSC ची लेखी परीक्षा सहज पास होणारे अत्यंत हुशार विद्यार्थी सु्द्धा मुलाखतीमध्ये बऱ्याचवेळा गोंधळून जातात. त्यामुळे मुलाखतीमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी नेहमीच उत्सुकता असते. त्याचबरोबर नेमका कोणता प्रश्न विचारला जाईल, याचाही कोलाहल मनाच्या गाभाऱ्यात सुरु असतो. मुलाखतीमध्ये फक्त विषयाशी निगडीत प्रश्न विचारले जात नाहीत, तर काही हटके प्रश्न विचारून संबंधित विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, ज्ञान, हजरजबाबीपणा आणि फिल्ड बॅकग्राऊंडही तपासून पाहिले जाते. राजस्थानमधून UPSC-2021 मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दैनिक भास्करशी बोलताना विचारलेल्या प्रश्नांची तसेच त्यांनी दिलेल्या उत्तराची माहिती दिली.
तर जाणून घेऊया UPSC साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात.
रवी सिहाग : हिंदी माध्यमातून टाॅपर (आॅल इंडिया 18 वी रँक)
प्रश्न - नागार्जुनच्या कवितांमध्ये कोणती विशेष खासियत आहे
उत्तर - 'जनता मुझसे पूछ रही क्या बतलाऊं, जनकवि हूं मैं साफ कहूंगा क्यों हकलाऊं' अशा नागार्जुनच्या कवितेच्या पंक्तीच त्याने म्हणून दाखवल्या. त्यानंतर त्याने सांगितले की, नागार्जुन यांची कविता समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
पवन कुमार कुमावत (आॅल इंडिया 551 वी रँक) सध्या बाडमेर जिल्हा उद्योग केंद्रात संचालक आहेत
प्रश्न - खादीन काय आहे ?
उत्तर- खादीन हे पश्चिम राजस्थानमधील शेताच्या बाजूला सिद्ध-पाल बांधून शेतजमिनीवर पावसाचे पाणी साठवण्याचे आणि अशा प्रकारे साठवलेल्या पाण्यापासून शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण करून त्यात पिके घेण्याचे पारंपरिक तंत्र आहे.
प्रश्न - आजच्या प्रदुषित वातावरणात तारे कसे दिसतात ? ते सर्वांत सुंदर कोणत्या ठिकाणावरून दिसतात ?
उत्तर - मी ग्रामीण जडणघडणीतून आलो आहे, त्या ठिकाणी सर्व काही सुंदर दिसते. बहुंताश वेळा लाईट नसते. त्यामुळे घराच्या छतावर झोपून रात्रीच्या वेळी चंद्र ताऱ्यांसह आकाश पाहतो. उंच पर्वतावरून आकाशाचा आनंद घेता येऊ शकतो. खरं, तर पवन यांनी आपल्या आवडीमध्ये निसर्गाची आवड असल्याचे नमूद केल होते.
राघव मीना (IPS ट्रेनिंग करत आहेत) एसटी कोट्यातून आॅल इंडिया 6 वी रँक
राघव मीना फायनान्स आणि परराष्ट्र व्यवहारांवर प्रश्न विचाररण्यात आले.
प्रश्न- LIC IPO का आणत आहे ? सरकारी कंपन्या IPO का आणतात ?
उत्तर - क्रिटीकल इन्वेस्टमेंटसाठी पैसा जवळ असावा, अशी सरकारची भावना आहे. मुळात सरकार सार्वजनिक गुंतवणुकीतून भांडवल वाढवण्यासाठी IPO आणते.
प्रश्न - भारत-चीनमध्ये सध्या कोणता मुद्दा चालू आहे?
उत्तर - भारत-चीनमध्ये सध्या सर्वांत मोठा मुदा विद्यार्थ्यांच्या व्हिसावरून चालला आहे. कोरोनामध्ये चीनमधून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा चीन व्हिसा मंजूर करत नाही आहे.
डॉ. कृष्णकांत ( आॅल इंडिया 382 वी रँक)
प्रश्न - मोफत सरकारी योजना योग्य आहेत का ?
उत्तर - उचित सक्षमीकरणासाठी या योजना योग्य आहेत. मात्र, अशा योजनांचा योग्य सेग्रिगेशन व्हायला हवे आणि पात्र लोकांना याचा लाभ मिळायला हवा. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. कमाईचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे.
प्रश्न - गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन पर्याय असल्यास कोणत्या ठिकाणी पोस्टिंग घ्याल ?
उत्तर - जर राजस्थानमध्ये पोस्टींग मिळाल्यास स्वीकारेन, कारण मी राजस्थानचा असल्याने राजस्थानला चांगल्या पद्धतीने ओळखतो.
डॉ. राहुल ( आॅल इंडिया 536 वी रँक)
प्रश्न - भारत रशिया-युक्रेन मुद्याला कसे पाहतो आणि त्याचा भारतावर काय परिणाम झाला आहे ?
उत्तर - सुरुवातीपासूनच रशिया भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे. युद्धानंतर युरोपकडून सातत्याने भारतावर दबाव होता की त्यांनी रशियाविरोधात व्हायला हवे. हा एक मोठा दबाव भारतावर होता, कारण मित्राच्या विरोधात भारत होऊ शकत नाही. बाकी जागतिक परिणाम दुसऱ्या देशांवर झाले ते तर आहेतच.
भविष्यकुमार ( आॅल इंडिया 29 वी रँक)
प्रश्न - श्रीलंकेतील राजकीय संकटाचे काय कारणे आहेत ? भारत श्रीलंकेसोबत सुरु असलेल्या मच्छीमारांच्या समस्येवर कसा मात करू शकतो ?
उत्तर - भविष्य यांनी उत्तर देताना सांगितले की, कोरोना महामारीने श्रीलंकेचा पर्यटन महसूल बुडाला. श्रीलंकन सरकारकडून सेंद्रीय शेती, चीनच्या जाळ्यात अडकेलेले द्विपक्षीय संबंध, भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही तेथील राजकीय संकटाची कारणे आहेत. श्रीलंकेला आर्थिक सल्ला आणि लाईन ऑफ क्रेडिट देऊन भारत सावरु शकतो. तसेच तमिळनाडू राज्याच्या द्विपक्षीय संबंधाने श्रीलंकेसोबतचा मच्छीमारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या