एनआयएनं सांगितलं आहे की, सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवलं होतं. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केलं जात होतं. एआयएनं म्हटलं आहे की, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केलं जाऊ शकतं.
ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारं आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. यानंतर अल-कायदाच्या या 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.