Telangana Tunnel Accident : तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आतील 3 मीटर छत कोसळून 8 कर्मचारी अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. आज सोमवारपासून उत्तराखंड सिल्क्यरा टनेल ऑपरेशनची टीमही बचावकार्यात मदत करत आहे. मात्र, बोगद्यात 11 किमी पाणी भरलं असल्याने त्यांच्या जिवीत असण्याची शक्यता धुसर आहे. 


चिखलामुळे पुढे जाण्यात अडचण 


राज्य सरकारच्या मालकीची कोळसा खाण कंपनी सिंगारेनी कोलियरीज देखील बचाव कार्यात गुंतली आहे. तेलंगणाचे मंत्री जुपल्ली कृष्ण राव म्हणाले की, मी कामगारांच्या जगण्याच्या शक्यतांबाबत कोणताही अंदाज बांधू शकत नाही, परंतु ते जिवित असण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु जर थोडीशी शक्यता असेल तर आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी बी संतोष यांनी सांगितले की, बोरिंग मशीन काम करत असलेल्या बोगद्यावर बचाव पथक पोहोचले आहे. आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. चिखलामुळे पुढे जाण्यात अडचण येत आहे.






बचावकार्यात एनडीआरएफ-एसडीआरएफ आणि लष्कराचे जवान


एसडीआरएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बोगद्याच्या आत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. गुडघ्यापर्यंत चिखल आहे. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवला जात आहे. पाणी काढण्यासाठी 100 अश्वशक्तीचा पंप लावण्याचे आदेश दिले आहेत. 145 NDRF आणि 120 SDRF जवान बचावकार्यासाठी तैनात आहेत. सैन्याची एक अभियंता रेजिमेंट, सिकंदराबाद येथील पायदळ विभागाचा भाग. त्याला बचावकार्यातही तैनात करण्यात आले आहे.


गद्याच्या प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचे छत कोसळले


22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचे छप्पर कोसळले आहे. यावेळी सुमारे 60 लोक बोगद्यात काम करत होते. 52 लोक कसेबसे जीव मुठीत घेऊन बचावले, पण टनेल बोरिंग मशीन (TBM) चालवणारे 8 लोक अडकले. यामध्ये 2 अभियंते, 2 मशीन ऑपरेटर आणि चार मजुरांचा समावेश आहे. बचाव कार्य केले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या