7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गेल्या 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या डीएबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा डीए म्हणजे महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये मार्च महिन्यात वाढ होणार आणि 18 महिन्यांपासून थकीत असलेली रक्कम होळीच्या सणाला मिळणार अशी माहिती होती. परंतु, सुत्रांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, 18 महिन्यांची डीएची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची डीएची थकबाकी आहे. सरकारने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
डीएची रक्कम मिळणार नसली तरी होळीच्या दिवशी सरकार डीएमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळत आहे. परंतु, तो वाढून 34 टक्के होणार आहे.
कोरोना महामारीमुळे थांबवला होता महागाई भत्ता
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. या पैशातून गरीब आणि गरजवंतांना सरकार मदत करू शकेल, या उद्देशाने महागाई भत्ता दिला नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.
पूर्ण वर्षात डीए आणि पगारात कपात झाली नाही
कोरोना महामारीमुळे सरकारने मंत्री आणि खासदारांच्या पगारात कपात केली होती. परंतु, गेल्या वर्षभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात केली नव्हती. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही कपात झाली नव्हती.
तीन टक्के होणार वाढ
कंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात यावेळी तीन टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे 31 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे वाढून तो 34 टक्के मिळणार आहे.
AICPI Index च्या अंदाजानुसार, डिसेंबर 2021 च्या निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्याचा सरासरी निर्देशांक 351.33 एवढा राहिला आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34.04 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
34 टक्के होणार डीए
जर कर्मचाऱ्याचा मुळ पगार हा 18 हजार असेल तर त्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या हिशोबानेच तुमचा पगारात वार्षीक 73 हजार 440 रुपयां वाढ होवू शतके. त्यानुसार मुळ पगारात वार्षीक 6 हजार 480 रुपयांची वाढ हाईल.
सुत्रांच्या माहितीनुसार, सरकार मार्च महिन्यात वाढीव महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे आचार संहिता लागली आहे. त्यामुळेच सरकार लगेच याबाबतची घोषणा करू शकत नाही.