Handedly dug Canal for irrigation : शेतीसाठी मुख्य असणारा घटक म्हणजे पाणी (Water). पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. त्यामुळं पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळं पाण्यासाठी लोक काही ही करु शकतात. आज आपण अशीच एक वेगळी माहिती पाहणार आहोत. ज्या व्यक्तिने पाण्यासाठी तब्बल 3 किलोमीटर लांबीचा कालवा (canal) हाताने खोदला आहे. लौंगी भुईया असं बिहार जिल्ह्यातील या अनोख्या अशा दुसऱ्या दशरथ मांझीचं नाव आहे. 


गावातील लोकांना शेतीसाठी, सिंचनासाठी पाणी मिळावं, गावाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लौंगी भुईया यांनी तब्बल  किलोमीटरचा कालवा खोदला आहे. लौंगी भुईया हे गया जिल्हा मुख्यालयापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांकेबाजार ब्लॉकच्या कोथिलवा गावातील रहिवासी आहेत. 70 वर्षीय लौंगी भुईया उर्फ ​​कॅनॉल मॅन यांनी डोंगराळ जमीन सुपीक करण्यासाठी 3 किलोमीटरचा कालवा खोदला आहे. त्यांनी पाच किलोमीटर कालव्याचे खोदकाम सुरु केले आहे. या कालव्याचे पाच किलोमीटर खोदकाम झाल्यास नगरपंचायतीच्या पाच गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. लौंगी भुईया यांनी तीन वर्षांपूर्वी पाच किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्याचे काम सुरू केले होते. आतापर्यंत ते 3.5 किलोमीटरवर पोहोचले आहे. दरम्यान, पाच किलोमीटरच्या कालव्याच्या खोदाईचे काम दीड वर्षात पूर्ण होईल, अशी आशा लौंगी भुईया उर्फ ​​कॅनॉल मॅनला आहे. ते रोज सकाळी घरून नाश्ता करून कोथिलवा गावातील डोंगरावर दोन किलोमीटर चालत जातात. त्यानंतर दिवसभर कालवा खोदतात आणि संध्याकाळी पाच वाजता परत येतात. 


2020 मध्ये ही खोदला होता तीन किमीची बोगदा


2020 मध्ये 70 वर्षीय लौंगी भुईया उर्फ ​​कॅनल मॅनने कोथिलवा डोंगरावरील डोंगराचे दगड कापून तीन किलोमीटर लांबीचा कालवा तयार केला होता. हा कालवा तयार करण्यासाठी त्यांना सुमारे 30 वर्षे लागली. तो कालवा खोदल्यानंतर लोक लौंगी भुईयाला कॅनॉल मॅन म्हणू लागले.  तीन किलोमीटर कालवा खोदल्यानंतर महिंद्रा कंपनीने लौंगी भुईयाला ट्रॅक्टर भेट दिला. आता लौंगी भुईया उर्फ ​​कॅनॉल मॅन आणखी पाच किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात व्यस्त आहे.


शेतीच्या सिंचनासाठी कालवे 


गावातील लोकांना शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा बांधण्यात येत असल्याचे लौंगी भुईया यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी डोंगरावर कालवे बांधले होते. मात्र आता शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे म्हणून प्रत्येकजण कालवा गावोगावी नेत आहे. या कालव्याच्या बांधकामामुळं पाच ते आठ गावांतील लोकांना सिंचनासाठी पाणी मिळू लागेल. सध्या ते डोंगरातून कालवा खोदत आहेत. हा कालवा चार ते पाच किलोमीटर लांबीचा असून तो दीड वर्षात पूर्ण करायचा आहे. गावातील बरेच लोक कमाईसाठी बाहेरगावी जातात आणि आपल्याला बाहेर जाऊन काम करायला आवडत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळं गावाला पाणी देण्यासाठी गावातच कालवा बांधण्याचे काम सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. 


काही लोकांनी कालव्याची नासधूस केली होती


दरम्यान, कालवा खोदत असताना काही लोकांनी दारू पिऊन मी खोदलेल्या कालव्याची नासधूस केल्याचे लौंगी भुईया यांनी सांगितलं. मात्र अशा लोकांनी काहीही केले तरी आम्ही हे काम पूर्ण करू असे त्यांनी सांगितले. लौंगी भुईया यांना  चार मुले आहेत, त्यापैकी एक मुलगा चेन्नईमध्ये काम करतो आणि तीन मुले गावात राहतात आणि शेती, मजुरी करतात. मुलं हे काम करु नका म्हणून सांगतात पण मी हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लौंगी भुईया यांचा मुलगा ब्रम्हदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील गावातील लोकांसाठी कालवे खोदण्याचे काम करतात, जेणेकरून पाणी गावात यावे. गावातील लोक शेतात सिंचन करू शकतील. याआधीही त्यांनी गावात पाणी जाण्यासाठी कालवा खोदला होता. आताही ते कालवा खोदत आहेत. वडील सकाळी 9 वाजता जेवण करून डोंगरात कालवा बांधण्यासाठी जातात. संध्याकाळी 5 वाजता घरी परत येतात. यापूर्वी डोंगरावर त्यांनी तीन किलोमीटरचा कालवा बांधला तेव्हा त्यांना महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टर दिला होता. काही लोकांनी पैसेही दिले होते.


महत्वाच्या बातम्या:


उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, शेकडो एकर शेती पाण्यात; ऊसासह द्राक्ष डाळिंबाचं मोठं नुकसान