नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर, ग्राहकांना आपल्याकडील नोटा बँकांमधून डिपॉझिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याबदल्यात नव्या 500 आणि 2000 च्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन ही करण्यात आले होते. त्यामुळे नोटा बदलीसाठी नाशिक प्रेसमधूनही 500च्या नव्या 50 लाख नोटा आरबीआयकडे पोहोचल्या आहेत.

नाशिक प्रेसमधून एकूण दोन टप्प्यात 500 च्या नोटा आरबीआयला पोहचवण्यात येणार होते. त्यापैकी आज 50 लाख नोटा आरबीआयकडे पोहचल्या आहेत. आता येत्या आठवड्यात आणखी 50 लाख नोटा आरबीआयला जाणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांनतर नाशिक प्रेसमध्ये चलनी नोटांची निर्मिती होते. त्यानुसारच नाशिक प्रेसमध्ये 500 च्या नोटा छापण्याचे काम सुरु आहे. यातील 50 लाख नोटा आरबीआयकडे पोहोचल्याने नागरिकांची अर्थिक कोंडी कमी होणार आहे.