नवी दिल्ली :  देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी निवडणुका होत आहेत. गोवा विधानसभा मतदानाने सुरुवात तर उत्तर प्रदेशातील मतदानाने पाच राज्यांच्या निवडणुकीचा शेवट होईल. 4 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान मतदान, तर सर्व राज्यांचा निकाल  11 मार्चला जाहीर होईल. गोवा, पंजाब आणि उत्तरखंडमध्ये एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक 7 टप्प्यात मतदान होणार आहे. कोणत्या राज्यात मतदान कधी? गोवा विधानसभा निवडणूक (40) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल पंजाब विधानसभा निवडणूक (117) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल www.abpmajha.in उत्तराखंड विधानसभा निवडणूक (71): 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (403) : 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल LIVE UPDATE
  • यूपी, पंजाब, उत्तराखंड- उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा - 28 लाख, तर गोवा आणि मणिपूर 20 लाख
  • उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक - निवडणूक आयोग
  • 5 राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक, सुमारे 16 कोटी मतदार
  • पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार
  • पाच राज्यात एकूण 690 विधानसभा जागांवर निवडणूक
  • प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पिकर वापरता येणार नाही
  • काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार
  • निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी
  • उमेदवारावर पाणी, वीज किंवा कोणत्याही बिलाची थकबाकी नको
  • गोवा - 4 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
  • पंजाब - 4 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
  • उत्तराखंड - 15 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
  • मणिपूर - 4 मार्च -पहिला टप्पा (38 जागा)
  • मणिपूर - 8 मार्च मतदान - दुसरा टप्पा (22)
  • उत्तराखंड - 7 टप्प्यात मतदान
  • पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी मतदान
  • दुसरा टप्पा 11 जिल्हे 67 जागा- 15 फेब्रुवारी मतदान (उत्तराखंडच्या बॉर्डरला लागून असलेले जिल्हे)
  • तिसरा टप्पा - 69 विधानसभा - 12 जिल्हे - मतदान -  19 फेब्रुवारी
  • चौथा टप्पा - 63 विधानसभा - 12 जिल्हे - मतदान - 23 फेब्रुवारी
  • पाचवा टप्पा - 52 विधानसभा - 11 जिल्हे - मतदान 27 फेब्रुवारी
  • सहावा टप्पा -  49 विधानसभा 7 जिल्हे  - मतदान 4 मार्च
  • सातवा टप्पा - 40 विधानसभा - 7 जिल्हे - मतदान 8 मार्च
निवडणूक निकाल - 11 मार्च  

पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती

राज्य एकूण जागा मुख्यमंत्री सत्ताधारी विरोधी पक्ष
उत्तर प्रदेश 403 अखिलेश यादव समाजवादी पार्टी (229) बहुजन समाजवादी पार्टी (80)
पंजाब 117 प्रकाशसिंह बादल (अकाली दल) शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) काँग्रेस 48
उत्तराखंड 71 हरीश रावत (काँग्रेस) काँग्रेस+बसपा+उत्तराखंड क्रांती दल भाजप (27)
मणिपूर 60 ओकराम इबोबीसिंग काँग्रेस (50) नागा पिपल्स फ्रंट (4)
गोवा 40 लक्ष्मीकांत पार्सेकर भाजप (21) काँग्रेस (7)
  राज्यनिहाय विधानसभा सद्धस्थिती उत्तरप्रदेश - 403
  • सत्ताधारी - समाजावादी पार्टी 229
  • मुख्यमंत्री अखिलेश यादव
  • बहुजन समाजवादी पार्टी- मायावती - 80
  • भाजप - 40
  • काँग्रेस- 28
  • राष्ट्रीय लोक दल (अजित सिंह)- 8
  • पीपी - 4
  • कौमी एकता दल - 02
  • तृणमूल काँग्रेस 1
  • इत्तेहाद ए मिल्लत - 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • अपक्ष - 6
  • राज्यपाल नियुक्त - 1
www.abpmajha.in पंजाब - 117
  • सत्ताधारी - शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) - 65
  • मुख्यमंत्री - प्रकाशसिंह बादल
  • विरोधी पक्ष - काँग्रेस 48
  • अपक्ष - 04
www.abpmajha.in  उत्तराखंड -  71
  1. सत्ताधारी -काँग्रेस (26) + बसपा (2)+ उत्तराखंड क्रांती दल 1 = 29
  2. विरोधी पक्ष - भाजप 27
  3. अपक्ष - 03
  4. अपत्रा ठरवेले - काँग्रेस 10 + भाजप 1
www.abpmajha.in गोवा - 40
  1. मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पारसेकर
  2. विरोधी पक्ष : काँग्रेस 07
  3. भाजप - 21
  4. काँग्रेस- 07
  5. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
  6. गोवा विकास पक्ष-02
  7. अपक्ष -05
  8. रिकाम्या -02
www.abpmajha.in मणिपूर - 60
  • मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंह
  • विरोधी पक्ष : नागा पीपल्स फ्रण्ट 04
  • काँग्रेस -50
  • भाजप -01
  • नागा पीपल्स फ्रण्ट (एनपीएफ) 04
  • रिकाम्या -05
  • एकूण60
www.abpmajha.in