पणजी : गोवा-कर्नाटक सीमेवर कारवारजवळच्या नागारमाडीमध्ये धबधब्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कारवारपासून 12 किमी अंतरावरील चांडीया धबधब्यावर ही दुर्घटना घडली आहे. नागारमाडीमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या गोव्यातील पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
आज रविवारी कारवारजवळच्या चांडीया धबधब्यावर हे सर्व पर्यटक फिरायला गेले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात फोटो काढण्याच्या नादात पाचजण वाहून गेले. यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
बुडालेले सर्वजण गोव्यातील वास्को आणि मडगाव येथील रहिवासी असून दोन महिलांचे मृतदेह हाती लागले आहे. उरलेल्या तिघांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.
गोव्याच्या सीमेवरील नागारमाडी धबधब्यात पाचजण बुडाले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2017 08:30 PM (IST)
रविवारी कारवारजवळच्या चांडीया धबधब्यावर हे सर्व पर्यटक फिरायला गेले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात फोटो काढण्याच्या नादात पाचजण वाहून गेले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -