Coronavirus Cases Today in India : एकीकडे कोरोनाचे उगम स्थान मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच आता देशातही कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे. सलग दोन दिवस कोरोना रुग्ण घटल्यानंतर आज कोरोनाबाधितांच्या संख्या वाढली आहे. देशात आज 389 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देशात 347 कोरोना रुग्ण आणि तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आदल्या दिवसाच्या तुलनेत आज 42 रुग्ण वाढले आहेत. सध्या देशात पाच हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.


देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.80 टक्के


भारतात 389 नवीन कोरोना रुग्णांसह देशातील एकूण कोरोना संसर्गाचा आलेख 4 कोटी 46 लाख 71 हजार 219 वर पोहोचला आहे. यामधील 5 लाख 30 हजार 608 रुग्णांचा मृत्यू झाला असून चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 5,395 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.01 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.80 टक्के आहे.






मागील काही दिवसांमधील कोरोनाची आकडेवारी



  • 26 नोव्हेंबर : 339 नवे कोरोना रुग्ण

  • 25 नोव्हेंबर : 347 नवे कोरोना रुग्ण

  • 24 नोव्हेंबर : 408 नवे कोरोना रुग्ण

  • 23 नोव्हेंबर : 360 नवे कोरोना रुग्ण

  • 22 नोव्हेंबर : 294 नवे कोरोना रुग्ण

  • 21 नोव्हेंबर : 492 नवे कोरोना रुग्ण

  • 22 नोव्हेंबर : 294 नवे कोरोना रुग्ण


कोरोना रुग्णसंख्येत चढउतार


गेल्या सात दिवसांमध्ये देशात 2 हजार 534 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागील सात दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या खाली असली, तरी रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.


चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर


कोराना विषाणूचं उगम स्थान मानलं जाणार्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सलग दोन दिवस 30 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण सापडले आहे. गेल्या सहा महिन्यांमधील ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.