एक्स्प्लोर
धुक्याचा कहर, यमुना एक्स्प्रेस वेवर 22 वाहनं एकमेकांवर आदळली
दाट धुक्यामुळे मथुरा शहरा जवळच्या यमुना महामार्गावर तब्बल 22 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
नवी दिल्ली : दाट धुक्यामुळे मथुरा शहरा जवळच्या यमुना महामार्गावर तब्बल 22 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. आज अचानकपणे मथुरा भागात मोठं धुकं पसरलं. या भागात दाड धुक्यामुळे पायी चालणंही अवघड झालं आहे. त्यामुळे असे अपघात होत आहेत.
अगदी काही फुटांवरचीही वस्तू देखील दिसत नसल्यामुळे पायी चालणंही अवघड बनलं होतं. धुक्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीने धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरचं काहीही दिसत नसल्याने पुढच्या वाहनांवर धडकली.
दरम्यान, सध्या जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. पुढचे काही तास महामार्गावरचं धुकं कायम राहिल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे धुक्यात वाहनं सावकाशपणे चालवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement