मुंबई : जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच काल निसर्ग चक्रीवादळाचा कहर आपण अनुभवला. कोरोना व्हायरसचं संकट सुरु असताना त्यानंतर निसर्ग वादळाने घातलेल्या थैमानानंतर आता आणखी एक संकट येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे. अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
नासानेच आपल्या वेबसाईटवरून असे सांगितले की, जून महिन्यात हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2002 एनएच फोर’ असे असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. 6 जून रोजी हा लघूग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्याचा व्यास 250 ते 570 मीटर इतका असल्याचे देखील नासाकडून सांगण्यात आले आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) 12 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. ‘2002 एनएच फोर’ हा लघुग्रह पृथ्वीपासून 5.1 दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, शनिवारी 6 जून रोजी एका मैदानाएवढ्या आकाराचा का विशाल लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. संशोधकांचा दावा आहे की, यामुळं पृथ्वीला कुठलाही धोका नाही. नासा ने याला 'नियर अर्थ ऑब्जेक्ट्स' च्या यादीत ठेवलं आहे. हा लघुग्रह 20,000 किमी प्रति तास वेगाने प्रवास करत आहे. हा लघुग्रह ज्यावेळी पृथ्वीला क्रॉस करेल त्यावेळी खू जास्त दूर असेल असं सांगण्यात आलं आहे.
नासाच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग 11.10 किमी प्रती सेकंद इतका असणार आहे. या सर्व खगोलीय वस्तूंचे वर्गीकरण हे पृथ्वीच्या दृष्टीने संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये करण्यात आले आहे. संभाव्य धोकादायक ठरणाऱ्या लघुग्रहांमध्ये 2002 एनएच फोर या लघुग्रहाचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
वाऱ्याच्या वेगानं येतोय लघुग्रह, पृथ्वीच्या जवळून जाण्याचा अंदाज पण धोका नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2020 01:57 PM (IST)
नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
या लघुग्रहाचे नाव ‘2002 एनएच फोर’ असे असल्याचे नासानं म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -