मुंबई: इतिहासात 19 जानेवारी हा दिवस अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा आहे. या दिवशी जगातील महान शोधकांपैकी एक जेम्स वॅट यांचा जन्म झाला. अनेकदा बल्ब वगैरे घ्यायला गेल्यावर दुकानदार किती वॉटचा बल्ब लागेल, असे विचारतात. बल्बसोबत वॅट हा शब्द का वापरला. वास्तविक वॅट हे शक्तीचे SI एकक आहे. जेम्स वॅट्सच्या योगदानाची ओळख म्हणून वॅटला पॉवरसाठी एसआय युनिट म्हणून निवडण्यात आले. तसेच भारताच्या राजकीय इतिसाहात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1966 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या होत्या. 


1597: मेवाडचा राजपूत राजा राणा प्रताप सिंह यांचे निधन.


1668: राजा लुई चौदावा आणि सम्राट लिओपोल्ड पहिला यांनी स्पेनच्या फाळणीबाबत करार केला.


1736:  वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक जेम्स वॅटचा जन्म


वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅटला ओळखले जाते. आजच्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारी 1736 रोजी त्याचा जन्म झाला. इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी जेम्स वॅटने त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे 1 मिनिटात 33 हजार पाऊंड वजन 1 फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने इंजिनाची अश्वशक्ती मोजली जाते आणि त्यानुसार इंजिनची किंमत ठरवली जाते. जेम्स वॅट्सच्या योगदानाची ओळख म्हणून वॅटला पॉवरसाठी एसआय युनिट म्हणून निवडण्यात आले. 


1855: प्रसिद्ध पत्रकार आणि भारतातील प्रमुख विचारवंत जी. सुब्रमण्यम अय्यर यांचा जन्म.


1905 : बंगाली लेखक देबेंद्रनाथ टागोर यांचा मृत्यू. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे देबेंद्रनाथ टागोर यांचे पुत्र होते.


1927: ब्रिटनने आपले सैन्य चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला.


1935: बंगाली चित्रपट अभिनेता सौमित्र चटर्जी यांचा जन्म.


1942: म्यानमारवर जपानचा कब्जा


दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने म्यानमार ताब्यात घेतला. 19 जानेवारी 1942 रोजी जपानने ब्रिटिशांना म्यानमारमधून हुसकावून लावलं आणि म्यानमार ताब्यात घेतला. जपानला या कामामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची मदत मिळाली. 


1966: इंदिरा गांधी यांची भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवड


देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 19 जानेवारी 1966 रोजी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान म्हणून निवड झाली. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले. 


इंदिरा गांधी त्यांच्या काही कठोर आणि वादग्रस्त निर्णयांसाठी लक्षात ठेवल्या जातात. त्यांनी 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा केली. 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळे त्यांचे प्राण गेले. 


1968: पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी 


डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी आजच्याच दिवशी, 19 जानेवारी 1968 रोजी जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.


1986: पहिला संगणक व्हायरस 'C.Brain' सक्रिय झाला.


1990: भारतीय विचारवंत आणि धार्मिक नेते आचार्य रजनीश यांचे पुण्यात निधन झाले.


2012: प्रसिद्ध संगीतकार आणि भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे मास्टर अँथनी गोन्साल्विस यांचे निधन.