On This Day In History : कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 साली झाला. वल्लभभाई पटेल हे पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे अपत्य. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरताही त्यांनी कार्य केले. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.


1935: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्मदिन 


लता मंगेशकर यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला. उषा यांनी आपल्या गायन कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड या सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उषा मंगेशकर यांनी 'सुबाह का तारा' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. उषा यांनी 1935 मध्ये पार्श्वगायिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपटात गाणी गायली. पण त्यांच्या कामाची ओळख 1975 मध्ये आलेल्या 'जय संतोषी मां' या चित्रपटाने झाली. या चित्रपटात त्यांनी 'मैं तो तेरी आरती उतारू' हे गाणे गायले होते. या गाण्याने त्याला रातोरात स्टार बनवले.


1950: नियोजन आयोगाची स्थापना


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नियोजनाचे एक औपचारिक मॉडेल स्वीकारण्यात आले आणि त्यानुसार थेट भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देणारा नियोजन आयोग 15 मार्च 1950 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला.


1976: फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा जन्मदिवस 


बायचुंग भुतियाचा हा भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आहे. त्याचा जन्म 15 डिसेंबर 1976 रोजी सिक्कीममधील टिंकिटम येथे झाला आणि त्याने आपली संपूर्ण कारकीर्द स्ट्रायकर म्हणून खेळली. भुतियाने राष्ट्रीय संघासाठी एकूण 104 सामने खेळले आहेत आणि सर्व स्पर्धांमध्ये 40 गोल केले आहेत.


1992: भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित


भारतीय चित्रपटसृष्टीचे महान आणि दिवंगत चित्रपट निर्माते सत्यजित रे हे एक उत्तम लेखक, कलाकार, चित्रकार, चित्रपट निर्माता, गीतकार, वेशभूषाकार होते. कला आणि साहित्याशी निगडित सर्जनशील कुटुंबात जन्मलेल्या सत्यजित रे यांनी जाहिरात एजन्सीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. सत्यजित रे हे त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटासाठी जगभरात ओळखले जातात, ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक प्रसिद्धी दिली. 30 मार्च 1992 रोजी सत्यजित रे यांना 'ऑस्कर लाइफ टाईम अचिव्हमेंट' मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सत्यजित रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.