10th July In History: 10 जुलै हा दिवस म्हटलं तर तो इतर सर्वसामान्य दिवसांसाखाच आहे. पण इतिहासाच्या चौकटीत डोकावून पाहिले तर या दिवसाच्या नावावर अनेक चांगल्या-वाईट घटनांची नोंद झाली आहे. यातील सर्वात महत्त्वाची घटना आपल्या शेजारील बांगलादेशची आहे. खरे तर 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पूर्व पाकिस्तान म्हणजे बांग्लादेश स्वतंत्र झाला. परंतु बांग्लादेशला पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास दोन वर्षे लागली. 1973 मध्ये 10 जुलै या दिवशी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला. 10 जुलै रोजी इतिहासात नोंदवलेल्या आणखी काही घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे...


1246: नसिरुद्दीन मुहम्मद शाह दिल्लीच्या गादीवर बसला.


1624: हॉलंड आणि फ्रान्स यांच्यात स्पॅनिशविरोधी करार झाला.


1848: न्यूयॉर्क आणि शिकागो दरम्यान पहिली टेलिग्राफ लिंक सुरू झाली.


1907: चीनचे स्वातंत्र्य आणि अखंडता राखण्यासाठी फ्रान्स आणि जपान यांच्यात करारावर स्वाक्षरी.


1946: राजेशाही संपल्यानंतर इटली हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले.


1965: ग्वाल्हेरमध्ये महिलांसाठी पहिले एनसीसी कॉलेज सुरू झाले.


1966: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात हवाई दलाच्या 'मिग' या लढाऊ विमानाच्या निर्मितीला सुरुवात झाली.


1972: हर्षवर्धन हे संपूर्ण वातानुकूलित जहाज मुंबईतील माझगाव बंदरातून सुरू करण्यात आले.


1973 : पाकिस्तानच्या संसदेने बांग्लादेशला मान्यता दिली


1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये (India Pakistan War 1971) भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला  स्वातंत्र्य केलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला (Shimla Agreement) येथे एक करार झाला. याला शिमला करार (Simla Agreement) म्हणतात. त्यात भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या बाजूने झुल्फिकार अली भुट्टो यांचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डिसेंबर 1971 च्या लढाईनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर बांग्लादेश (Bangladesh Liberation War) पाकिस्तानपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश झाला. 1971 च्या युद्धात 90 हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर पाकिस्तानने आपला पराभव मान्य केला होता. 


बांग्लादेश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी त्याला पाकिस्तानने मात्र मान्यता दिली नव्हती. दोन वर्षांनंतर म्हणजे 10 जुलै 1973 रोजी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला. 


1983: मार्गारेट थॅचर ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्या.


1999: जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेची सुरुवात.


2002: पाकिस्तानने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर K-2 चे नाव बदलून 'शाहगोरी' केले.


2003: नासाचे मंगलयान रोव्हर प्रक्षेपण.