चेन्नई : तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची जे बोलणार ते करुनच दाखवणार अशी ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षांना मात देण्यास यश मिळालं.


सत्तेत आल्यानतंर अम्मांनी 21 जून 2001 साली रात्री 2 वाजता राजकीय विरोधक करुणानिधी यांना तरुंगात टाकलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र नंतर करुणानिधी यांची सुटका करण्यात आली.

तामिळनाडुमध्ये अम्मांनी 2001 साली मोठा निर्णय घेत लॉटरी तिकिटांवर बंदी घातली.

अम्मांनी 2001 साली मंदिरांमध्ये जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद केली. मात्र 2004 साली निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

संपकरी कामगारांवर कडक कारवाई करत अम्मांनी 2001 साली एकदाच 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. या निर्णयानंतर अम्मांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला.

तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच महिला पोलिस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय अम्मांनी घेतला. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी महिला पोलिस स्टेशन आणि महिला पोलिस कर्मचारी तैनात केले.

1992 साली अम्मांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी 'क्रेडल बेबी स्कीम' सुरु केली.

गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी जयललिता यांनी 2013 साली अल्पदरात जेवण देणारी 'अम्मा कँटिन' सुरु केली. या कँटिंनमध्ये एक रुपयात इडली, तीन रुपयांत दोन चपात्या, पाच रुपयात सांबर-लेमन राईस किंवा दही भात दिला जातो.

2016 साली अम्मांनी दारुबंदीसाठी मोठं पाऊल उचलत राज्यातील 500 दारुची दुकानं बंद केली.

संबंधित बातम्या :

जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री - ओ पन्नीरसेल्वम!


पहिल्यांदा स्कर्ट घालणारी अभिनेत्री ते मुख्यमंत्री, जयललितांचा प्रवास


'अम्मा'च्या फोटोसह पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!


तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन