Road Accident: राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) एका अनियंत्रित ऑडी कारने रस्त्यावरील दुचाकींना जोरात धडक दिली. यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. या अपघातात एक जणांचा मृत्यू झालाय. तर, 8 जण जखमी झाले. जखमींना जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.


आमित नागर असे ऑडी कार चालकाचं नाव आहे. आमित नंदनवन येथील रहिवाशी असून आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास एम्स रोडवरून जात असताना त्यांच्या वाहनाला आपघात झालाय. दरम्यान, रस्त्यावरून जात असताना ऑडी कारने दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला झोपड्यांत घुसली. या घटनेत 8 जण जखमी झाले असून एका जणांचा मृत्यू झालाय. घटनेनंतर स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ऑडी चालक आमित नागर यांना ताब्यात घेतलंय. तसेच जखमींना जोधपूर रुग्णालयात दाखल केलं.


एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी जोधपूरच्या चौपास्नी हाऊसिंग बोर्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एम्स रोडवर एक मोठा अपघात घडला. दरम्यान, एका अनियंत्रणीत कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडींमध्ये घुसली. ज्यात एकाचा मृत्यू झालाय. तर, 8 जण जखमी झाले.


व्हिडिओ- 



राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडलेली दुर्घटना दुर्देवी आहे. आम्ही या घटनेतील जखमींचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.



हे देखील वाचा-