वॉशिंग्टन: येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत अध्य़क्ष पदाचे उमेदवार जो बायडेन जर जिंकले तर एक-दोन महिन्याभरातच त्यांची जागा कमला हॅरिस घेतील असा खळबळजनक आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी त्यांच्या विरोधकांवर केला.
बुधवारी झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या डिबेटमध्ये उपाध्यक्ष माईक पेन्स आणि कमला हॅरिस हे दोघे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांत ट्रंम्प यांनी कोरोनाच्या काळातील हाताळलेली परिस्थिती , चीनसोबतचा तणाव, वंशभेदाचा मुद्दा आणि वातावरण बदल या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाली. या वादविवादात माईक पेन्स यांनी कमला हॅरिस यांना डाव्या विचारांची व्यक्ती असे संबोधले होते.
कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उपाध्यक्षीय पदाच्या उमेदवार आहेत
फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रंम्प म्हणाले की, "कमला हॅरिस या 'भयंकर' आहेत. त्या कम्युनिस्ट आहेत. सोशलिस्ट विचारांच्याही पलिकडचे त्यांचे विचार आहेत. प्रत्येकाचे मत हे त्यां डाव्या विचारांच्या आहेत असेच आहे. जो बायडेन जर सत्तेत आले तर केवळ दोनच महिन्यांत त्यांची जागा कमला हॅरिस घेतील असे माझे मत आहे. आपल्याला कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष हवा आहे का?"
उपाध्यक्ष पदाच्या वादविवादानंतर ट्रंम्पनी पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. फोनवरून घेण्यात आलेली ही मुलाखत जवळपास एक तास चालली होती.
ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावरील आपला हल्ला अधिक तीव्र करताना सांगितले की कमला यांच्या विचारांवर लक्ष द्या. त्यांना आपल्या देशाच्या सीमा खुल्या करायच्या आहेत आणि हत्यारी, खुनी, बलात्कारी लोकांना आपल्या देशात प्रवेश द्यायचा आहे.
ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांना 'राक्षस' आणि 'चिडखोर' असेही म्हंटले.
उपराष्ट्रपती पदाच्या डिबेट नंतर एका रॅलीला संबोधित करताना माईक पेन्स म्हणाले की, "ही डिबेट दोन व्यक्तीतील नसून दोन विचारांतील होती. जो बायडेन आणि कमला हॅरिस हे कर वाढ, देशाच्या खुल्या सीमांचे समर्थन करतात तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाला बंद झालेलं हवं आहे."
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. ते आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन व्हाईट हाऊसवर आले आहेत. येत्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची बायडेन यांच्यासोबत दुसरी अध्यक्षीय डिबेट होणार आहे. कोरोना काळात सुरक्षेच्या कारणाने ही डिबेट व्हर्च्युअल घेणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलय. यामुळे ट्रंम्प यांनी अशा डिबेटमध्ये मी सहभागी होणार नाही असे सांगत या डिबेटवर बहिष्कार टाकायचं घोषित केले आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जर बायडेन निवडणूक जिंकले तर 'कम्युनिस्ट' कमला हॅरिस त्यांची खुर्ची बळकावतील: डोनाल्ड ट्रंम्प
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2020 02:23 PM (IST)
ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांना 'राक्षस' असे संबोधले आणि त्या निवडून आल्यास देशात गुन्हेगारांना प्रवेश मिळेल असाही आरोप केला.
ट्रंम्प यांच्या मते जो बायडेन हे दोन महिनेही अध्यक्ष राहणार नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -