नवी दिल्ली : तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आता डीसीजीआय देखील ही लस मंजूर करील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञ समितीने आता डीसीजीआयकडे या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूर करण्याची शिफारस केली आहे.
कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्ड लसीला तज्ज्ञ समितीने हिरवा कंदिल दाखवला आहे.
कोवॅक्सीन पहिली भारतीय लस
कोवॅक्सीन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. भारत बायोटेक आणि एनआयव्ही पुणे यांनी एकत्रितपणे ही लस तयार केली आहे. अशा प्रकारे, ही लस तज्ञ समितीने मंजूर केलेली दुसरी लस आहे.
शुक्रवारी ऑक्सफोर्ड लसीला मिळाला होता ग्रीन सिग्नल
शुक्रवारी तज्ज्ञ समितीने ऑक्सफोर्डची लस मंजूर केली. ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेका सोबत भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस विकसित केली आहे. ऑक्सफोर्ड लसीला 'कोविशिल्ड' असे नाव देण्यात आले आहे.
देशभरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन
आज (शनिवार) देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. अशातच कोवॅक्सीन लसीला मंजुरी मिळल्याने देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
लसी संदर्भातील अफवांकडे दुर्लक्ष करा : आरोग्यमंत्री
शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लसीची ड्राय रनचा आढावा घेतला. लसीबाबत कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. लोकांचे प्राण वाचवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
संबंधित बातमी
सर्व भारतीयांना नाही तर फक्त 'यांनाच' मोफत लस!, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
Exclusive : 'भारतात येत्या काही दिवसांत 2-3 लसींना मान्यता मिळेल', CSIR महासंचालकांचं मत
भारतात कोरोनाच्या नवीन विषाणू संक्रमितांची संख्या 33 वर, ब्रिटनहून गुजरातला आलेले चारजण पॉझिटिव्ह