Ambernath News : अंबरनाथ पश्चिम येथे फातिमा शाळेजवळ इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला तर एक महिला किरकोळ जखमी झाल्याची थरारक घटना घडली आहे. साधारण 25 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ (Ambernath) शहरात धोकादायक इमारतीचा (Building) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


अंबरनाथ पश्चिम भागात फातिमा शाळेजवळ अण्णा अपार्टमेंट (Apartment) नावाची जुनी चार मजली इमारत असून या इमारतीचा चौथ्या मजल्याचा  स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. यामध्ये मृत पावलेल्या महिलेचं नाव गायत्री गुप्ता असे असून 47 वर्षीय या महिलेच्या डोक्यावर गंभीर मार (Severe Injury) लागल्याने महिलेचा  मृत्यू झाला असल्याने गुप्ता कुटूंबियावर  शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटना स्थळी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी (Police) धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोसळलेल्या स्लॅबचा राडरोडा हटवण्याचे काम पालिका प्रशासन (Municipal Administration) करत आहे. मात्र आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत पालिका अधिकाऱ्यांची विचारणा केली असता इमारतीचा स्ट्रक्चर ऑडिट (Structure Audit) तयार करून पुढील कारवाई (Action) करण्यात येईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.


47 वर्षीय या महिलेच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने महिलेचा  मृत्यू झाला असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनं अंबरनाथमधील इतर जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी वेळीच दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. तर जुन्या झालेल्या इमारतीत राहणं धोक्याचं ठरू शकतं हे आता या घटनेने दाखवून दिले आहे. अंबरनाथमध्ये आता या घटनेने भितीचे वातावरण तयार झाले आहे. 


घटनास्थळी मोठी गर्दी


फातिमा शाळेजवळ इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यु झाल्यानंतर तेथील रहिवासी लोकांनी (Resident People) घटनास्थळी मोठी गर्दी (Huge Crowd) केली. तर पाठोपाठ प्रशासकीय यंत्रणा (Administrative System) देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


 


इतर महत्वाच्या बातम्या