गोंदियात जीर्ण इमारतीमुळे भर उन्हात विद्यार्थी घेत आहेत शिक्षणाचे धडे
गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या चिचोली गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात बसवून भर उन्हात शिक्षण घ्यावे लागत आहे.
तरी देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याची अद्याप दखल घेतली नसल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
चिचोली गावात जि.प. पूर्व माध्यमिक शाळा असून या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरत असून जवळपास 65 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेची इमारत फार जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते त्यामुळे वर्गखोल्यात बसवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे धोकादायक झाले आहे.
यामुळे गावातील सर्व पालक व नागरिक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकमताने बैठक घेतली.
शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन केशोरी यांना पत्र देऊन शाळेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
तर जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आमच्या पाल्यांना तुम्ही शाळेच्या प्रागंणात शिकवण्याची विनंती पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे केली आहे.