Indian Diet : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचे जीवन प्रचंड धावपळीचे झाले आहे. याशिवाय कुटुंब, ऑफिस आणि आर्थिक मिळकत यामुळे बहुतेक माणसं तणावात असल्याचे दिसून येतात. या सर्व गोष्टींमुळे आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होते. बाहेरचे जेवण आणि फास्टफूडमुळेही आरोग्यावर परिणाम होते. त्यामुळे आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी आहारात विविध पोषण तत्वांचा समावेश केला तर आपले आरोग्य चांगले राहू शकते. यासाठी आपल्या भारतीय खाद्यपदार्थांचा आहारात (Indian Diet) समावेश केला तर आरोग्यासाठी खूपच फायेदशीर आहे. 


आहाराशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. इरफान शेख यांच्या म्हणण्यानुसार, 'जर आपण नियमित व्यायामासोबत आरोग्यवर्धक भारतीय आहारशास्त्राचे पालन केलं, तर आपण स्वत:चं स्वत:चे फिटनेस गुरू बनू शकतो. पण आपण ज्या प्रदूषित पर्यावरणाच्या संपर्कात येतो त्यावर आपले नियंत्रण नाही. पण, आपण निश्चिपणे आरोग्यवर्धक आहाराचा अंगीकार करू शकतो. आपल्याला निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारावर लक्ष द्यायची आवश्यकता आहे. 'वाढत्या वयात शरीरात तीन महत्त्वाचे बदल होतात. त्यामध्ये लांब हाडांसोबत स्नायूचा विकास, हार्मोनल परिपक्वता आणि रक्तपेशी, रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी. या तिन्हींचा विकास होण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. शेख यांच्या म्हणण्यानुसार, 'तुम्हाला योग्य पोषण तत्वांची आवश्यकता आहे.'


 


1. हाडांचा विकास 


बहुतांश लोक हाडांच्या मजबूतीसाठी अतिरिक्त प्रोटीन आणि कॅल्शियम घेण्याचा विचार करतात. पण विटामिन डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटामिन- क, पेशी आणि फॅटी अॅसिडही निरोगी हाडांच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे.मास, मच्छी, हरभरा, विविध पालेभाज्या, दाल तडका आणि जवसाची चटणी यापासून भरपूर पोषण तत्वे मिळतात.  या पोषण तत्वांमुळे हाडे बळकट होण्यास मदत होईल. 


 


2. रक्तपेशी 


आहार तज्ज्ञ डॉ. शेख यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शरीरातील निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोह, विटामिन बी-12 आणि फेशींच्या वाढीसाठी फोलेटची आवश्यकता असते. लोहाच्या कमतरतेमुळे मुलांच्या शरीरातून ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी गरजेच्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी समस्या निर्माण  होते. पालक पनीर, पालक भात, पालक दाळ, दाळ-सूप, मेथी पराठा आणि बिट इत्यादी. या सारख्या पोषण तत्वे असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करा. 


 


3. हार्मोन्स


संतुलित आहार, फायबरयुक्त आहार, अतिरिक्त पोषण तत्व, तणामुक्त जीवनशैली, नियमित व्यायाम, नियंत्रित  वजन आणि यासोबत चांगली झोप मुलांच्या सुरूवातीच्या वर्षाच्या दरम्यान शरीरीतील परिपक्वव हार्मोन्सच्या यशस्वी वाढीसाठी खूप महत्वाचे आहे. हळदीच्या रुपात कर्क्युमिन घटकाच्या सेवनामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. तुळशीचा चहा प्यायल्याने रक्तातील रोगप्रतिकारक पेशी वाढतात आणि कार्यक्षमताही वाढते. 


 


4. वयाच्या तिशी आणि चाळीशीत घ्यावयाची काळजी


आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपण विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषत: तिशी आणि चाळीशी असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. यासाठी संतुलित आहाराच्या जीवशैलीचा अवलंब करा.


 


1. कोलेस्ट्रॉल :


शरीरातील कोलेस्टॉल कमी करण्यासाठी  भरपूर पालेभाज्या, फळे आणि फायबरयुक्त आहार, विशेषत: मासे आणि सी-फूड सेवन करा.


 
2. तणाव  :


सध्या करिअर, उत्पन्न आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा तणाव दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करा. यासोबत व्यायाम, योग आणि ध्यानधारणा करा.



3. उच्च रक्तदाब :


बहुतांश लोकांना उच्च रक्तदाबची असून त्यांना समजून येत नाही. याचं कारण याचे कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत. यासाठी तुमच्या नजीकच्या चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची आवश्यकता आहे. उच्च रक्तदाबाचा आजार नियंत्रित राहण्यासाठी सोडियम आणि चहाचे सेवन कमी करा. 
 


5. संतुलित आणि आरोग्यवर्धक आहार : 


आपले जसे-जसे वय वाढत जाते, त्यानुसार आपण जे अन्न सेवन करतो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण काहीही खाण्यापू्र्वी त्याचा विचार करायला हवा. आपल्या भारतातील स्थानिक खाद्यपदार्थात प्रचंड वैविध्य आहे. याचा आपल्या आहारात समावेश केला तर आरोग्य चांगले राहण्यास मिळते. आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी काही नियम पाळावे लागतील ते असे... 



1. तुमच्या  शरीरातील स्नानूंच्या विकाससाठी, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि किंवा आजारातून बरं होण्यासाठी कोणत्याही वयात प्रोटीनची आवश्यकता असते. यासाठी मटण,  दुग्धजन्य पदार्थ, दूध, मच्छी, खोबरं, सुखामेवा आणि पनीरचे सेवन करावे.


2. तुमच्या नियमित आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करा. जसे की, फळभाज्या, वेगवेगळी फळे, सोयाबीन  यासारख्या अन्नपदार्थामुळे शरीराचे वजन आणि कोलेस्टॉलचे प्रमाण कमी होते. याशिवाय हरभरा, वांग्याचे भरीत आणि  उपमा यासारख्या अन्नपदार्थांचा समावेश करू शकता. 


3.आहार तज्ज्ञ डॉ. शेख यांच्य म्हणण्यानुसार, आपल्या वाढत्या वयोमानानुसार शरीरीतील हाडांची झिज होते आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. यासाठी दूध, दही  आणि पनीर या कॅल्शियमयुक्त  पदार्थांचा आहारात समावेश करावा.  तिळाची चटणी, डोसा आणि पनीर मसाला यासारख्या स्थानिक अन्नपदार्थाचाही आहारात समावेश करायला हवा. तसेच आपल्याला शरीराला सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशापासून विडामिन डी मिळते.   


 


ही बातमी वाचा :


Fiber Rich Diet : फायबरयुक्त आहारामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत, 'ही' फळं ठरु शकतात फायदेशीर!