अमरावतीः सत्ता दूर जाताना पाहून उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खऱ्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात  राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.


खऱ्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचे रक्षण करा


त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहे. मात्र उद्धव ठाकरेंचे गुंडांनी दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. आमदारांचे कार्यालय फोडण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे समर्थक आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने सुरक्षा प्रदान करावी.


राऊत यांच्या म्हणण्याचे अर्थ काय?


दुसरीकडे आमदारांची सुरक्षा आम्ही काढलेली नाही, मात्र कुटुंबियांना सुरक्षा नाही असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले याचा अर्थ काय? ते शिंदे समर्थक आमदारांना मारणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदारांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचेही सांगितले.


आमच्यावरही खोट्या केसेस


यावेळी राणा यांनी अडीच वर्ष आमच्यावर तुम्ही अन्याय केला आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्हाला त्रास दिला तसेच सर्व शिंदेसमर्थक आमदारांच्या कुटुंबियांना तुम्ही उघडपणे धमकी देत आहात. हे आता सहन केले जाणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'


Maharashtra Political Crisis Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढले


Maharashtra Crisis Aaditya Thackeray : शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; आदित्य ठाकरेंचे मुंबईत आज-उद्या मेळावे


Maharashtra Political Crisis Timeline : राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं?