IMD Heatwave in Mumbai :  उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे.  रविवारी (13 मार्च) मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं . हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी  पालघर, ठाणे, मुंबई(Mumbai), रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेसह ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जाहीर केला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे येलो अलर्ट असणार आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की  ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा अर्थ काय? याबद्दल माहिती जाणून घेऊयात...


ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड हे कलर कोड त्या विशिष्ट क्षेत्रातील हवामानाच्या स्थितीची तीव्रता दर्शवतात. हे रंग प्रशासनाने हवामानाशी संबंधित आपत्तीजनक घटनेबाबत देखील माहिती देतात. जाणून घेऊयात या रंगांबाबत माहिती-


ग्रीन अलर्ट (Green Alert)- ग्रीन अलर्टचा अर्थ कोणतीही वॉर्निंग नाही. म्हणजे कोणतेही संकट नाही, सर्व काही ठिक आहे. 
येलो अलर्ट (Yellow Alert)- येलो अलर्ट म्हणजेच हवामानामध्ये होणाऱ्या बदलांकडे 'लक्ष ठेवा', 'अपडेटेड रहा'.


ऑरेंज अलर्ट (Orange Alert)- नैसर्गिक आपत्तीसाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून ऑरेंज अलर्ट दिला जातो. तसेच लोकांना सावध करण्यासाठी हा अलर्ट दिला जातो. 
रेड अलर्ट (Red Alert)- रेड अलर्ट म्हणजे 'चेतावनी'. हवामाना संदर्भातील अतिधोकादायक परिस्थिती ओढावते, तेव्हा रेड अलर्ट देण्यात येतो. यावेळी आरोग्य यंत्रणा, आपात्कालीन विभाग आणि नागरिकांना सतर्क राहून येणारी परिस्थिती हाताळावी लागते. 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha