Horoscope Today 3 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 3 मार्च 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today 3 March 2024) जाणून घ्या...


कर्क (Cancer Today Horoscope) 


आजचा सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा असेल. आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. पालकांशी कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. जुने आजार त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. व्यवसायाची स्थिती चांगली दिसत आहे, आज तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. वाहन वापरताना काळजी घ्या,  दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारणं अपेक्षित आहे.


सिंह (Leo Today Horoscope) 


आज तुमचा नवीन शत्रू निर्माण होण्याची भीती आहे. कृषी क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तात्पुरतं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यावसायिक करार सावधगिरीने हाताळा. आज तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. आज घरी खाण्याचा चांगला बेत असेल, जे पाहून तुमचं मन खुश होईल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुमची तब्येत बिघडू शकते.


कन्या (Virgo Today Horoscope) 


आज तुम्हाला बराच मोकळा वेळ मिळेल आणि तुम्ही विचारांत दिवस घालवाल. अतिविचारांमुळे आज तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. काही गोंधळाची स्थिती असेल तर ती तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलून सोडवली जाऊ शकते. आज तुम्ही मित्रांना भेटलात तर तुमचं मन हलकं होईल. आज तुमची धार्मिक कार्यातील आवड वाढेल. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडू शकतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचं मार्गक्रमण 'या' राशींसाठी ठरणार घातक; हातातून पैसा जाणार, प्रचंड धनहानी होणार