Horoscope Today 20 January 2025 : पंचांगानुसार, आज 20 जानेवारी 2025, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
कौटुंबिक जीवनात अचानक घडामोडी घडतील. वाहने सावधतेने चालवा.
वृषभ (Taurus Horoscope Today)
व्यवसायामध्ये काही नवीन प्रोजेक्टसाठी गुंतवणूक कराल. महिलांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन मिळेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे संधी निघून जाऊ शकते.
कर्क (Cancer Horoscope Today)
थोडी अस्थिर मनोवृत्ती राहील. करिअरकडे लक्ष देता देता घरातील लोकांचाही विचार करा.
सिंह (Leo Horoscope Today)
कोणतीही गोष्ट टोकाला न्यायची नाही हे ठरवून टाका. महिलांना घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
जोडीदाराशी झालेल्या वैचारिक मतभेदांमध्ये तुम्हालाच दोन पावले मागे यावे लागणार आहे.
तूळ (Libra Horoscope Today)
समजूतदारपणा ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील. महिला जरा जास्तच एकलकोंड्या बनतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
कधी कधी प्रचंड हट्टीपणामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल. समजुतीचे धोरण ठेवा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीचा अहंकार यशापासून मागे खेचतो, हे लक्षात राहू द्या.
मकर (Capricorn Horoscope Today)
ऐकावे जनाचे करावे मनाचे, यानुसार वागणूक ठेवावी लागेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
कितीही प्रतिकार झाला तरी स्वतःची प्रगती करून घेणार आहात.
मीन (Pisces Horoscope Today)
घरातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली असूनही हात राखून खर्च कराल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: