HMPV Patient in Nagpur : नागपुरात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होते. मात्र आता या दोन्ही लहानग्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे.


दोन्ही मुलांची प्रकृती सुधारली- जिल्हाधिकारी विपिन इटनकर


सध्या नागपूर मध्ये HMPV व्हायरसचे एकही रुग्ण नसून आढळून आलेले दोन्ही रुग्ण हे संशयित रुग्ण आहे. सध्याघडीला त्यांची  प्रकृती बरी असून त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच या आजाराबद्दल भाष्य करता येईल. सात वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे की नाही, या संदर्भातील तपासानी नमुने पुण्यातील एम्स ला पाठवले आहे. त्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतरच आपल्याला कळू शकेल की ते पॉझिटिव्ह आहे की नाही. सध्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. त्यामुळे नागपूरकरांना भितीचं काहीही कारण नसल्याची प्रतिक्रिया नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे.


नागपूरकरांसाठी भितीचं काहीही कारण नाही- जिल्हाधिकारी   


देशभरात HMPV व्हायरसचे रुग्ण आढळत असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून प्रसारमाध्यमांवर प्रसारित केले जात आहे. त्या संदर्भात आरोग्य विभागामार्फत सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या संदर्भात गाईडलाईन्स देखील देण्यात आल्या आहे. अशातच नागपुरात दोन मुलांना या रोगाची लागण झाल्याची बातमी पुढे आली होती. सध्या या दोन्ही मुलांची प्रकृती सुधारली असून अंतिम अहवाल आल्यानंतरच  त्यांना या रोगाची लागण झाली होती की नाही हे स्पष्ट होईल. मात्र नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.  


काय करावं?



  • खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. 

  • साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.

  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.


काय करणं टाळावं? 



  • खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. 

  • टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. 

  • आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.  

  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. 



हे ही वाचा