Hingoli News: राज्यभरात मंगळवारपासून (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षा (HSC Exam) सुरु झाल्या आहेत. त्यामुळे वर्षभर मोठ्या कष्टाने अभ्यास करत विद्यार्थी परीक्षेला सामोर जात आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात देखील बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. पत्नी बारावीची परीक्षा देत असताना, पती आपल्या लेकराला सांभाळतानाचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात परीक्षा केंद्राच्या बाहेर हा व्यक्ती एका झाडाला झोका बांधून, त्या बालकाचा सांभाळ करताना पाहायला मिळत आहे. 


राज्यभरामध्ये कालपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातसुद्धा बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान या परीक्षाकाळामध्ये एका परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका बांधल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल होतोय. हा फोटो हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील अमृतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील आहे. एका बाळाची आई परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला आली होती. तर नंदिनी साबळे असे या महिलेचे नाव आहे. मात्र परीक्षा काळात बाळाने रडू नये म्हणून चक्क परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या झाडाला साडीने झोका बांधून परीक्षेतील पेपर लिहिण्यासाठी परीक्षा केंद्रात गेली होती. तर बाळाची काळजी घेण्यासाठी वडील बाळाजवळ थांबले होते. तर परीक्षा कधी संपते याची वाट बाळ आणि त्याची आई पाहत असल्याचा हा फोटो समाज माध्यमात व्हायरल होतोय. 


भरारी पथक देखील तैनात


हिंगोली जिल्ह्यातील एकूण 120 महाविद्यालयातील 13  हजार 441 विद्यार्थी यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते. ज्यात 33 परीक्षा केंद्र आणि 05 परीक्षक केंद्रावर परीक्षा होत आहे. सोबतच परीक्षा केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच शिक्षण विभाग आणि महसूल विभागाचे भरारी पथक देखील तैनात करण्यात आले होते. 


पहिल्याच दिवशी 12 विद्यार्थी रेस्टिकेट


हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला 95.49 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याचा दिवशी दोन ठिकाणी 12 विद्यार्थ्यांना कॉपी करताना एका पथकाने पकडले. तर अनेक केंद्रांवर कॉपीचा मुक्तसंचार होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. तसा प्रकारही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. तसेच कुरुंदा येथे नरहर कुरुंदकर विद्यालयात 9 तर गिरगाव येथे बहिर्जी स्मारक विद्यालयात 3 जणांना कॉपी करताना भरारी पथकाने पकडले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


HSC Exam: बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जण जालन्यातील


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI