हिंगोली : एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर  त्याचा  राग मनात ठेवून सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जण्यास लोक तयार होतात. नुकताच असाच एक प्रकार उघड झाला. हिंगोलीत (Hingoli News)  आई - वडिल पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या जन्मदात्यांचा खून करत अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या आई वडिलांचा खून (Hingoli Murder)  करणाऱ्या नराधमास पोलीसांनी अटक करत त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


काही दिवसापूर्वी डिग्रस वाणी (Digras Wani) गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये  आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.  हा अपघात नसून अपघाताचा बनाव करत मुलानेच आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. महेंद्र जाधव असे आरोपी मुलाचे नाव आहे. 


अपघात झाल्याचा रचला बनाव


11 जानेवारी रोजी सकाळी दिग्रस वाणी गावाच्या शिवारात दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या वळणात पडलेली आढळून आली.  त्या ठिकाणी वडिल कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव यांचा मृतदेह आढळून आला.  सुरुवातीला ही घटना अपघात असून अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आला होते. परंतु अपघात स्थळ बघता हा  अपघात नसल्याचा संशय पोलिसांना आला.  त्यामुळे हिंगोली पोलिसांनी अधिक तपास केला असता  मयत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याकडे या प्रकरणाची सुई फिरत होती.


असा रचला खूनाचा कट


पोलिसांनी महेंद्र जाधवला ताब्यात घेत चौकशी केली असता खून केल्याची कबुली महेंद्रने दिले. महेंद्रचे आई वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत. तसेच  नातेवाईकांमध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरून बदनामी करत असल्याचा राग मनात महेंद्रच्या मनात होता.  महेंद्रने क्राईम सिरीयल बघत स्वतःच्याच आई-वडील आणि भावाचा खून करण्याचं कट रचला .यामध्ये आरोपी महेंद्र जाधव हे सर्वात आगोदर भाऊ आकाश जाधव त्यानंतर आई कलावती जाधव आणि शेवटी वडील कुंडलिक जाधव यांना मारले.  त्यानंतर गावाजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला अपघाताचा बनाव करत मृतदेह त्या ठिकाणी मृतदेह  टाकला.  पोलीस तपासात उघड माहिती झाल्यावर आरोपी  महेंद्र जाधवच्या विरोधात स्वतःच्या भाऊ आणि आई-वडिलांचा खून केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हे ही वाचा :