Hingoli Crime News : हिंगोलीमध्ये बुलढाणा अर्बन बँकेमध्ये (Buldhana Urban Bank) सुमारे 80 लाखांना आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. बुलढाणा अर्बन बँक शाखा कळमनुरी (Kalamnuri Branch) येथील शाखा व्यवस्थापक आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मार्फत सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (Buldhana Urban Bank Scam) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आर्थिक गैरव्यवहाराची (Hingoli Crime News) नरक्कम सुमारे 80 लाख रुपयांपेक्षाही जास्त असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे 


बुलढाणा अर्बन बँकेत 80 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार


बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कळमनुरी शाखेमध्ये (Hingoli Buldhana Urban Bank Scam)  70-80 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. ग्राहकांनी बचत खात्यामध्ये ठेवण्यासाठी आणलेली रक्कम व्यवस्थापक आणि रोखपालाने खात्यात न टाकता परस्पर उचलून घेत हा अपहार केला आहे. हा प्रकार 17 जुलै रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर बँकेत आपण ठेवलेली रक्कम व्यवस्थित आहे का, त्याचबरोबर ती रक्कम बँकेतून काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँक परिसरामध्ये मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 


बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी 


अनेकांनी लोकांनी घाम गाळून केलेली कमाई या बँकेमध्ये ठेवली होती. या पैशाच्या भरवशावर शेतातील कामे मुलामुलींची लग्न त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे म्हणून वापरता येतील या उद्देशाने हे पैसे बँकेत जमा ठेवले होते. पण शाखा व्यवस्थापक रोखपाल त्याचबरोबर सहाय्यक शाखा व्यवस्थापक यांनी ग्राहकांच्या खात्यातून ही परस्पर रक्कम काढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. अनेकांनी या पैशाच्या भरोशावर मुलींची लग्न सुद्धा ठरवल्याचं ग्राहक सांगत आहेत.


गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता


बँकेतील या अपहारप्रकरणी आता कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये बुलढाणा को-ऑपरेटिव्ह बँकेचे विभागीय व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर, इतर दोन आरोपी फरार आहेत. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम अजून वाढण्याची शक्यता असून बँकेच्या वतीने शाखेतील व्यवहाराचे ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Hingoli Crime News : पोलीस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीला 3.90 लाखांना गंडा