हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलांना थंडीत जमिनीवर ती झोपवल्याची वेळ आली आहे. शस्त्रक्रिया नंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे.


 काल शुक्रवारी महिलांवरती कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना जमिनीवरती झोपण्याची वेळ आली आहे नागरिकांनी याबाबत आरोग्य यंत्रणांवर आपला रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांच्या स्वच्छतेबाबत देखील काळजी घेतली गेली पाहिजे ती घेतली जात नसल्याचा देखील यातून समोर येत आहे. याप्रकरणी रुग्णालयावर आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.


हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात काल 43 महिलावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्या महिलांना रुग्णालयात झोपण्यासाठी कॉट उपलब्ध नसल्याने त्या महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियांचा टार्गेट प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला दिले जातं. पण त्या तुलनेत साहित्य सामग्री मात्र दिली जात नाही. त्यामुळे या रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या 43 महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवर झोपवले आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणाच जमिनीवर असल्याचं वास्तव समोर आलं आहे. संबंधित रुग्णालयातील दोषी डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 


या 43 महिलांच्या जीवाशी खेळला जात असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे व्यवस्थित काळजी घेणे त्याचबरोबर स्वच्छता या सर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असत मात्र शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना अशा प्रकारे जमिनीवर झोपवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयामध्ये पुरेशी साधनसामग्री उपलब्ध आहे की नाही असा देखील सवाल या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी अद्याप रुग्णालयाकडून किंवा आरोग्य विभागाकडून कोणताही वक्तव्य किंवा कोणती माहिती देण्यात आलेली नाही याबाबतचा त्यांचं म्हणणं देखील समजू शकलेला नाही मात्र रुग्णालयात सध्या स्थिती दिसणारी परिस्थिती ही मोठी धक्कादायक आहे.


ठाकरे गटाच्या आमदाराची प्रतिक्रिया


याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश अष्टीकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, मला या घटनेबाबतची माहिती नव्हती. मी अधिवेशनामध्ये होतो. मी या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट देईन आणि असा काही प्रकार तिथे घडत असेल तर त्याची दखल नक्की घेतली जाईल. हा प्रकार ठीक नाहीये. शस्त्रक्रिया केल्यानंतर जर महिलांना जमिनीवर झोपवलं जात असेल तर ती अतिशय धक्कादायक आणि वाईट गोष्ट आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर ती लवकरात लवकर कारवाई केली जाईल. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे असही त्यांनी पुढे म्हटलं आहे.