Hingoli Farmers Agitation : हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी (Hingoli district Farmers) आक्रमक झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) झाला होता. यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं होते. सेनगाव (Sengaon) तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र, या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळं गेल्या आठ दिवसापासून शेतकरी संपवार आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी कन्हेरगाव-जिंतूर रोडवर टायर जाळून राज्य शासनाचा निषेध केला. तर गोरेगाव इथं शेतकऱ्यांनी कांदे, टोमॅटोसह भाजीपाला रत्यावर फेकून रोष व्यक्त केला.


शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून संपावर


हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाले होते. काही भागात शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात वाहून गेली होती. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. शेतीच्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्यावतीनें प्रती हेक्टर 13 हजार 500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र, या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळं शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून संपावर गेले आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेतकऱ्यांनी कन्हेरगाव जिंतूर-रोडवर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध केला. तसेच गोरेगाव इथे शेतकऱ्यांनी कांदे टोमॅटे याचबरोबर भाजीपाला रत्यावर फेकून रोष व्यक्त केला. आम्हाला तत्काळ नुकसाभरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.




40 ते 45 गावातील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित


नुकसान झालेल्या सेनगाव तालुक्यातील तीन मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्यानं पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळं या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळं गेल्या आठ दिवसापासून गोरेगाव येथील सर्व शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य शासनानं अद्यापही या संपाची दखल घेतली नाही. त्यामुळं गोरेगावमधील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परवा शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला होता. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करावा. तसेच तत्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी  केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: