EPFO Pension :  सध्या भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) कार्यालयात पेन्शनसाठी निवृत्तीधारकांची मोठी गर्दी उसळली आहे. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्चपर्यंत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीधारकांची पेन्शन कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च निवृत्ती वेतनासाठी पात्र कर्मचाऱ्यांच्या दोन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रथम श्रेणी अंतर्गत, जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS चे सदस्य होते आणि EPS मधून उच्च निवृत्ती वेतनासाठी निवडले होते त्यांना ठेवण्यात आले आहे. तसेच, तो आधीपासूनच अधिक योगदान देत होता, परंतु जास्त पेन्शनची विनंती ईपीएफओने फेटाळली होती. दुसऱ्या वर्गात ते कर्मचारी येतात, जे सप्टेंबर 2014 पर्यंत EPS चे सदस्य होते, परंतु आवश्यक अर्ज सादर करून उच्च पेन्शनचा पर्याय निवडू शकले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहे.


ज्या कर्मचाऱ्याने दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त नोकरी केली आहे त्याला पेन्शनची सुविधा मिळते मात्र त्यासाठी त्याची एम्प्लॉयर पीएफ ऑफिसमध्ये नोंदणी असणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एखादा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य झाल्यास तो ईपीएसचा देखील सदस्य होतो. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के वाटा पीएफमध्ये असतो. कर्मचाऱ्याव्यतिरिक्त तेवढाच भाग कंपनी-मालकाच्या खात्यातून देखील जमा करण्यात येते. पण कंपनी मालकाच्या योगदानाचा एक भाग ईपीएस योजनेत जमा केला जातो. ईपीएसमध्ये मूळ वेतनाचे योगदान 8.33 टक्के तर पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 15 हजार रुपये इतकी आहे. अशात 1 हजार 250 रुपये जास्तीत जास्त फंडात जमा करता येतात. याचाच अर्थ जर एखाद्याचा पगार 15 हजारांहून अधिक असेल तरीही 1 हजार 250 रुपये जमा केली जाते. 15 हजारांहून कमी असल्यास मात्र कमी रक्कम जमा होते. याचा अर्थ म्हणजे 10 हजार पगार असल्यास फक्त 833 रुपये जमा होतील. त्यामुळे ईपीएसच्या नियमानुसार पेन्शन मिळण्याची कमाल मर्यादा ही 7 हजार 500 रुपये आहे 


मासिक पेन्शन कशी मोजली जाते? 


मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यातील योगदान वर्ष) / 70 


उदाहरण : एखाद्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल (यात बदल होतो, जो सरासरी केल्यावर सर्वात जास्त तो पकडायचा) आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा चार हजार रुपये पेन्शन मिळेल. 


दुसरं उदाहरण, जर कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्यांनी जर 18 वर्षे काम केलं तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतकं पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या: