Papaya Seeds benefits : पपई हे खूप स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. पपई खाणे केवळ त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीदेखील चांगले असते. अनेकदा पपई खाल्ल्यानंतर लोकं बिया फेकून देत असतात. पण या बिया त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतात. अनेक आजारांवर पपईच्या बिया खाणे हा रामबाण उपाय ठरतो. या बियांमध्ये पोषक तत्तवे असतात. पपईच्या बिया काळ्या रंगाच्या असतात. या बिया खायला कडवट लागतात. त्यामुळे बिया वाळवून खायला हव्यात.
त्वचेसाठी गुणकारी - त्वचेच्या संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
जळजळीपासून सुटका - पपईच्या बिया जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. संधिवात किंवा जळजळी सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पपईच्या बिया उपयोगी पडतात.
हृदविकाराच्या समस्येपासून मुक्तता - हृदयविकाराच्या आजारांपासून सुटका करण्याचा पपईच्या बिया हा रामबाण उपाय आहे. पपईमध्ये अॅंटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात आढळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर आहेत.
वजन कमी करण्यास फायदेशीर - वजन कमी करण्यासाठी पपईच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते. वाढलेली वजन पपईच्या बिया जलद गतीने नियंत्रणात आणतात.
ब्रेकफास्ट न करण्याचे तोटे
एका रिपोर्टनुसार, ब्रेकफास्ट न करण्याची सवय असणाऱ्या महिलांना टाईप 2 मधुमेहाचा सर्वाधिक धोका असतो. तर, नोकरीमध्ये व्यग्र असणाऱ्या आणि सकाळचं भोजन न करणाऱ्या महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका 54 टक्के असल्याची बाब समोर आली. आरोग्यदायी असा ब्रेकफास्ट करणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका अतिशय कमी असतो. अनेक निरीक्षणांतून हेसुद्धा लक्षात आलं आहे की, ब्रेकफास्ट न करणं हे स्थुलतेचं कारणंही ठरु शकतं.
टीप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
संबंधित बातम्या
Health Care Tips : अंडी शरीरासाठी फायदेशीर, पण अतिसेवन अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
Health Care Tips: वजन वाढवण्यासाठी 'या' सुक्या मेव्याचा करा आहारात समावेश
जिऱ्याचं पाणी प्यायल्याने झटपट कमी होईल वजन; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha