Happy Valentine's Day 2023 Wishes : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. चॉकलेट डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे, हग डे असे अनेक दिवस या व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जाातात. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यानचा हा आठवडा प्रेमीयुगुलांसाठी फारच स्पेशल असतो. याच आठवड्यातला शेवटचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) उद्या साजरा केला जाणार आहे.
व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनविण्यासाठी तुमच्याही डोक्यात अनेक प्लॅन्स सुरु असतील. पार्टनरला खुश ठेवण्यासाठी कोणतं गिफ्ट द्यावं, फिरायला कुठे जावं? असे अनेक विचार तुमच्या मनात सुरु असतीलच. पण त्या आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही शब्दांत भावना व्यक्त करत नाहीत तोपर्यंत तुमच्या पार्टनरला स्पेशल फिल होणार नाही. मुलींना सहसा शब्दांतून भावना व्यक्त करणारी मुलं फार आवडतात. त्यामुळे तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर फिलिंग्स शेअर करण्यासाठी आणि तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही खास पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता.
तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने काही खास शुभेच्छा संदेशचे पर्याय सुचवले आहेत. तुम्ही ते तुमच्या पार्टनरला भेटून, ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून किंवा थोड्या हटके स्टाईलने नक्कीच शेअर करू शकता. हे शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी...
1. "माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू
माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू
माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू
ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत
ती माझी सर्वस्व आहेस तू
हॅपी व्हॅलेंटाइन डे 2022"
2. आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
Happy valentine's day!
3. तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तू फक्त मलाच मागशील.
Happy Valentine's Day!
4. नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Valentine's Day!
5. डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
Happy Valentine's Day!
या शुभेच्छा जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला दिल्या तर ती व्यक्ती नक्की तुमच्यावर खुश होईल. आणि तुमचा दिवस अधिक खास होईल.
महत्त्वाच्या बातम्या :