Gulabrao Patil, Poharadevi : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. गुलाबराव पाटील बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. आय Love यू, प्यार का वादा फिप्टी फिप्टी, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राठोडांना प्रपोज केलंय. गुलाबराव पाटील यांनी आज (दि.15) पोहरादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. शिवाय संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दर्शनही घेतले. यावेळी त्यांनी संजय राठोडांची स्तुती केली.
श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा. श्रीकांत शिंदे, कबिरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल महाराज, रायसिंग महाराज, मोहिनीताई इंद्रनिल नाईक, वरिष्ठ अधिकारी, भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी हा जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले,"सेवालाल महाराजांचे दर्शन घेतले आता विरोधकांपासून थंडी वाजणार नाही. सरकार निवडून आणण्याची ताकद बंजारा समाजात आहे. संजयभाऊ माझा 20 वर्षांपासूनचा मित्र आहे. 'ये प्यार का वादा है झाला आय लव्ह यु फिफ्टी-फिफ्टी"
पोहरादेवीसाठी सव्वा सातशे कोटी रुपयांचा निधी
महाराष्ट्र मध्ये जर सर्वात हुशार मंत्री कोण असेल तर हा पठ्ठ्या आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काय जादू केली काय माहिती? एकट्या पोहरादेवीसाठी सव्वा सातशे कोटी रुपयांचा निधी आणला. आम्ही दोन दाढीवाले विना दाढीवाल्याला काही कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाढीवाले आणि वर पंतप्रधान मोदी हे देखील दाढीवाले आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.
तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरीगडाचा कायापालट होणार; 723 कोटींचा प्रकल्प
देशभरातील बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगडाच्या विकासासाठी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी ७२३.९८ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. येत्या काळात तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरीगडाचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे केले.
विकासकामांसाठी निधी खेचून आणला - गुलाबराव पाटील
संजय राठोड यांनी एका पर्यटनस्थळासाठी साडे सातशे कोटी रुपयांचा डल्ला आणला, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या