बीड : बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या मादळमोही गावाची ओळख आहे ती श्री मोहिमाता देवीमुळे. राष्ट्रीय महामार्ग 222 वरुन या गावी जाता येतं. साधारणपणे 15 हजार लोकसंख्या असलेल्या मादळमोही या गावाला दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. जागृत देवस्थान श्री मोहिमाता मोहिदरा नदीला महापूर आल्यामुळे मादळ आणि मोही या दोन गावांपैकी मादळ हे गाव वाहून गेले. त्यामुळे या गावाचे मोही येथे पुनर्वसन करण्यात आले. या गावाची ग्रामदेवता मोहिमाता जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री मोहिमातेची आख्यायिका मादळमोही या गावाला मोठी परंपरा आहे. दीड हजार वर्षांपूर्वी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेने येथे प्रकट होवून दृष्टांत दिला. त्यानंतर गावात हेमाड पंथी मंदिर बांधण्यात आलं. माती आणि सिमेंटचा तसूभरही वापर न करता दगडी बांधकाम जुन्या काळाची आठवण करुन देतं. कल्लोळाचं ऐतिहासिक स्थान मोहिमातेच्या मंदिरात दगडी बांधकाम केलेले अर्धा एकर परिसरावर असलेलं कल्लोळ आहे. हे कल्लोळ येणाऱ्या भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतं. फार पूर्वी या कल्लोळात उत्सवाच्या आधी लागणाऱ्या स्वयंपाकाच्या भांड्यांची यादी टाकली जात असे. यादीतील भांडी तरंगून वर येत असत असं सांगितलं जातं. आज मात्र हे पाहायला मिळत नाही . मोहिमातेच्या यात्रेला भाविकांची गर्दी अश्विन एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दरवर्षी याठिकाणी यात्रा भरते. यावेळी बारा बैलगाड्या ओढण्याचा नवस हजारो लोक फेडतात. संध्याकाळी देवीचा छबिना निघतो. नवस पूर्ण झालेले भाविक अन्नदान आणि वस्त्रदान करतात. यात्रेदरम्यान कुस्त्यांचा आखाडाही रंगतो. मराठवाड्यातून हजारो भाविक मोहिमातेच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहिमाता प्रसिद्ध आहे. मादळमोही आणि आसपासच्या बारा गावातील लोक मोहिमातेच्या दर्शनाला दरवर्षी येतात . मोहिमातेच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे दगडानं बांधलेलं आहे. मंदिरातील कोरीव काम, आकर्षक कळस, कळसावर असलेल्या गणपती, महालक्ष्मी, सरस्वती, शंकर यांच्या मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतात. पाहा व्हिडिओ : ग्रामदेवताः

ग्रामदेवताः बार्शीचं श्रद्धास्थान श्री भगवंत

रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत ‘श्री देव भैरी’ 

ग्रामदेवता : विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान पातूरची रेणूका माता

ग्रामदेवता : खरसुंडी गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसिद्धनाथ

ग्रामदेवता : खान्देशातील भाविकांचं श्रद्धास्थान यावलची श्रीमनुमाता

ग्रामदेवताः महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचा आधारवड विठ्ठलाई

ग्रामदेवता: अमरावतीतील स्वयंभू पिंगळाई देवी

ग्रामदेवता: बुलडाण्यातील खामगावची श्री जगदंबा

ग्रामदेवता: परभणीतील मानवतचा मोठा मारुतीराया

ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ

ग्रामदेवता: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील श्रीधनदाई देवी

ग्रामदेवता : हातकणंगलेतील पट्टणकोडोलीचा श्रीबिरदेव

ग्रामदेवताः नाशिक जिल्ह्यातील नांदगावची ग्रामदेवता एकवीरा देवी

ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी