मुंबई : संप काळात फळं, भाजीपाला आणि शेतमालाची खरेदी-विक्री होऊन माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या विक्रीतील अडचणी दूर करण्यासाठी सरकारने संनियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यासाठी मदत क्रमांकही देण्यात आला आहे.


पणन विभागामार्फत पुणे, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई, जिल्हास्तर तसेच तालुकास्तर या विविध स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

या सर्व संनियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी हे आवश्यकतेनुसार संबंधित पोलिस अधिकारी, परिवहन अधिकारी यांची मदत घेऊन फळे आणि भाजीपाला आणि लागणाऱ्या शेतमालाची खरेदी-विक्री करुन तो माल ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची दक्षता घेतील, असं सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

संप काळात कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास त्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथे स्थापन केलेल्या राज्य नियंत्रण कक्षाला द्यावी, असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं आहे.

  • संपर्कासाठी क्रमांक : 020-24261190/24268297/24263486,

  • टोल फ्री क्रमांक 18002330244