Google Flights New Feature : आपल्यापैकी अनेक जण कित्येकदा विमानाने प्रवास करतात. मात्र विमानाने प्रवास करायचे म्हणले की, खूप पैसे मोजावे लागतात. पण आता विमानाचे तिकट स्वस्तात मिळणार आहे. Google Flights ने बाजारात एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे, या फिचरमुळे तिकीटाचे पैसे वाचवणे खूप सोपे होईल. कंपनीने सोमवारी सकाळी एका ब्लॉग पोस्टद्वारे नवीन फिचरची अधिकृत घोषणा केली आहे.
बहुतेक लोक जे फ्लाइटने प्रवास करतात ते अनेक महिने आधीच फ्लाइट बुक करतात, खरे तर असे करण्यामागचे एक मोठे कारण हे आहे की, ऐनवेळी फ्लाईट बुक केली तर तिकीटाकरता जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत, हे नवीन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि सर्वात स्वस्त विमान तिकिटे केव्हा उपलब्ध आहेत हे तुम्हाला योग्य वेळ कोणती हे सांगेल. गूगलचे हे फिचर प्रवाशांना विमान तिकीट केव्हा बुक करणे योग्य आहे, हे सुद्धा सांगेल. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा ठरेल.
फ्लाइटची तिकिटे कधी स्वस्त मिळतात हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगल फ्लाइट्समध्ये उपलब्ध किंमत ट्रॅकिंग पर्यायाला सिलेक्ट कारावे लागेल. त्यानंतर हे फीचर सक्रिय होईल आणि फ्लाइटच्या किमती कमी होताच. हे तुम्हाला सूचनाद्वारे अलर्ट करेल, की आता फ्लाइट तिकिटाची किंमत कमी झाली आहे आणि तुम्हाला ते बुक करण्याची चांगली संधी आहे. हे फिचर वापरण्याकरता Google मध्ये साईन ईन करावे लागेल. तुम्ही एकदा साइन इन केल्यानंतर तु्म्हाला फ्लाइट रिझल्ट दिसतील. सध्या असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे स्वस्तात फ्लाइट बुकींग देण्याचा दावा करतात, मात्र बुकिंग प्रक्रिया पूर्ण करताना डिस्प्लेमध्ये दाखवलेल्या भाड्यापेक्षा फ्लाइटचे भाडे खूपच जास्त असते. जर तुम्ही महिन्यातून अनेकदा विमानाने प्रवास करत असाल तर हे फिचर तुमच्याकरता फायदेशीर आहे. यामुळे तुमचे पैसे मोठ्या प्रमाणात वाचू शकतात. तुम्ही यापैकी एक फ्लाइट बुक केल्यास, Google Flights वैशिष्ट्य दररोज उड्डाण करण्यापूर्वी किमतीचे निरीक्षण करेल. फ्लाइटची किंमत कमी झाल्यास, Google कमी केलेले भाडे तुम्हाला Google Pay द्वारे परत करेल.
इतर महत्वाच्या बातम्या