गोंदिया : गोंदियातील (Gondia News) प्रियंका बैस या तरुणीने 23 व्या वर्षी पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादीत करत तिनं विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल थांबवण्यात आला होता. मात्र हा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.
गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस या तरुणीने वर्ष 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएसस परीक्षेचा निकाल अडकवून ठेवण्यात आला होता. मात्र हा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.
23 व्या वर्षी प्रियंकाने पोलिस होण्याचे स्वप्न केले पूर्ण
पण म्हणतात ना मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळवता येते हेच सिद्ध करून दाखविले आहे. गोंदियातील प्रियंका बैस या तरुणीने पदवी पर्यंतचे शिक्षण गोंदियात घेत स्पर्धा परीक्षेकरता कुठलीही क्लास जॉईन न करता पुण्यातील एका वाचनालयात बसून तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. प्रियंकाचे वडील रामसिंग बैस हे देखील गोंदिया पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे प्रियंकाला लहानपणापासूनच वर्दीची नोकरी मिळावी हे स्वप्न तिने पहिले असून त्याची तयारी देखील प्रियंकाने वयाच्या 21 व्या वर्षी सुरु केली. 23 व्या वर्षी प्रियंकाने पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करत आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले आहे.
तर आपल्या मुलीने देखील वडिलांच्या पाठोपाठ पोलीस खात्यात नोकरी मिळविल्याने प्रियंकाच्या आई वडिलाने देखील आनंद व्यक्त केला. पोलीस खात्यात नोकरी करत असलेल्या पोलिस शिपायाची मुलीने एमपीएससी परीक्षा पास करत पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे
सुनील कचकवाड हा राज्यात पहिला
संभाजीनगरमधील सुनील कचकवाड हा राज्यातून पहिला आला आहे. तर या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. निकाल लागल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे एमपीएससीच्या 2020 मधील पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला येणारा विद्यार्थी हा संभाजीनगर मधील आहे.
हे ही वाचा :