गोंदिया:  गोंदिया (Gondia News) जिल्हा हा नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाच्या सोयी-सुविधा अद्यापही नाहीत. उच्च शिक्षणाकरता येथील विद्यार्थ्यांना नागपूर किंवा पुणे मुंबई सारख्या शहरात जावं लागतं. गोंदिया जिल्ह्याचा शिक्षनाचा दर्जा वाढावा याकरता गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅबचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत हे सर्व टॅब जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना आणि शाळांना पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेता येणार आहे. 


 सध्या दफ्तराचे ओझे वाढले आहे. त्यामळे विद्यार्थ्याना पुस्तकांच्या व्यतिरिक्त नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरता गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 16 नामांकित शाळेमधील 87 शिक्षकांना टॅब मोबाईलचे वाटप केले आहे. शाळेतील जे शिक्षक तंत्रस्नेही आहेत. त्यांना हे मोबाईल पुरवठा करण्यात आले आहे. जेणेकरून या टॅब मोबाईलद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणं सोप होईल तसेच यूट्यूब, दिशा ॲप, यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना काही नवीन शिक्षणं देतील जेणे करून विद्यार्थ्याना वेगवेगळया तंत्रज्ञानाची माहिती होईल. इतकेच नाही तर स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा संदर्भातील माहिती विद्यार्थ्याना सहज उपलब्ध होईल. या टॅबच्या सहायाने शिक्षकांना सुध्दा कुठलीही गोष्ट सहज शिकवण सोप होणारं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारेल हीच अपेक्षा आहे.


 आदर्श शाळांना केले टॅबचे वाटप 


गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत एकूण 87 टॅब वाटप करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ज्या आदर्श शाळा आहेत अशा शाळांना या टॅब वितरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेणे अधिक सोयीस्कर झाले आहे. 


ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढणार


या टॅबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. तर शैक्षणिक ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सुकर होणार असून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दर्जा या माध्यमातून आणखी वाढणार आहे.


राज्यशासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविणाऱ्यावर भर देत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन त्या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Nashik News : नाशिकमध्ये महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना मोफत टॅब, दररोज 6 जीबी डाटा, वर्षभर इंटरनेट फ्री