Nana Patole : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अयोध्या दौऱ्यावर गेले यात नवे काय? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. इथे शेतकरी (Farmers) आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेती पंपाला वीज मिळत नसल्याचे पटोले म्हणाले. ते अयोध्येला गेलेत आम्ही पण जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. शेतकऱ्यांचे विषय घेतले असते तर चर्चा केली असती असेही पटोले म्हणाले. ते गोंदिया जिल्ह्यातील राका इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
कोरोनाची वेळेत उपाययोजना करण्याची गरज : नाना पटोले
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याचे वेळीच नियोजन करायला पाहिजे. WHO ने सांगितल्याप्रमाणं देशाच्या सीमा सील केल्या गेल्या पाहीजे कारण की कोरोना चीनमधून येत आहे. त्यामुळं सीमा सुरक्षित करायला पाहीजे. बाहेरच्या देशातून जे लोक येतात त्यांची तपासणी करुनच आपल्या देशात प्रवेश द्यायला पाहिजे असे नाना पटोले म्हणाले. मात्र, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. कोरोनाला थांबवण्याकरता ज्या उपाय योजना करायला पाहिजे ते केंद्र सरकार करत नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा संकट आले आहे. अशातच राज्यामध्ये लसीचा तुटवडा पाहायला मिळत आहे. यावरुन पटोलेंनी सरकारवर टीका केली. देशामध्ये ज्या लोकांना लस दिली गेली, तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला असल्याचे पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे सेनेला राज्यभरातील तळागाळात नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रचार करणं ही सध्याची राजकीय खेळी दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरीत घालवतील. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिंदे मंदिराचं बांधकाम पाहतील.
महत्त्वाच्या बातम्या: