गोंदिया: गुप्तधनातून करोडपती होण्याचे आमिष दाखवत गोंदियात एका व्यक्तीला ज्येष्ठ व्यक्तींची तब्बल सात लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबासह दोघांवर देवरी पोलिसांनी अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 80 वर्षांच्या वृद्धाला गुप्तधनातून (Secret Money) कोट्यधीश होशील, असे आमिष देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल सात लाख रुपये उकळले आहेत. ही घटना गोंदिया (Gondia Crime News) जिल्ह्याच्या खुर्शीपार येथे घडली आहे.
खुर्शीपार येथील ग्यानिराम उके (80) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने त्रास नष्ट होणारी औषधी कुठे मिळेल, असे नातेवाइकांना विचारले असता, नातेवाइकांनी या मांत्रिकाचा नंबर दिला. नातेवाईकांच्या माध्यमातून त्या मांत्रिकासोबत त्यांची चांगली ओळख झाली. त्यातून ग्यानिराम उके यांनी गुडघेदुखीची औषधे घेतली. त्या औषधामुळे त्यांना आरामही झाला. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपी गोपाल वैद्य (55, रा. पारडीसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर) याने आपले व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांना दिले होते.
गुप्तधन तुला काढून देतो, असे आमिष दाखवले
औषधी घेण्यासाठी गेलेल्या ज्ञानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे, ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो, असे त्याने सांगत तू करोडपती होशील, असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास - ठेवत खुर्शीपार येथील ग्यानिराम उके यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली. आरोपींनी त्यांच्या जवळून सात लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात देवरी पोलिसांनी दोन आरोपींवर भादंविच्या कलम 420, 34 सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व - जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदूबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत भूतबाधा घालवणे, गुप्त धन काढून देणे, पैशांचा पाऊस, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळतात अशा भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा :