Gondia Crime Latest News update: जमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कोयलारी शेंडा गावात ही घटना घडली आहे. या वादात मृत शेतकऱ्याचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिस याचा कसून तपास करत आहे. हल्लेखोरांनी 55 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून आणि कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. या घटनेमुळे गोंदियात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिरालाल मेश्राम (55) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. तर, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. हिरालाल मेश्राम यांच्याशी ताराचंद पुस्तोडे व त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी जमिनीच्या कारणावरून वाद घातला. रागाच्या भरात ताराचंद पुस्तोडे व विनोद पुस्तोडे यांनी हिरालाल मेश्राम यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात हिरालाल मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भांडणात हिरालाल मेश्राम यांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय अन् घडलं काय ?
शेतीच्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. या घटनेत हिरालाल मेश्राम (55) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा पवन हा गंभीर जखमी आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोयलारी (शेंडा) गावातील हिरालाल मेश्राम (55) व ताराचंद पुस्तोडे यांच्यात नेहमी जमिनीच्या वादावरून खटके उडत होते. जमिनीच्या कारणावर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी देखील हिरालाल मेश्राम यांच्याशी ताराचंद पुस्तोडे व त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी जमिनीच्या कारणावरून वाद घातला.
शेतातील पाईपलाईन दुरुस्त करण्याकरता गेलेल्या हिरालाल मेश्राम व त्याचा मुलगा पवन याला रागाच्या भरात ताराचंद पुस्तोडे व विनोद पुस्तोडे यांनी अंगावर ट्रॅक्टर चढवून डोक्यावर वार केले. तर, अन्य दोघांनी हाताने पकडून ठेवत काठीने देखील बेदम मारहाण केली. यात हिरालाल मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भांडणात हिरालाल मेश्राम यांचा मुलगा जखमी झाल्याने त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. देवरी पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
ही बातमी देखील वाचा
Pune Bypoll Election: पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान