Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघाताने राज्यासह देशात एकच खळबळ उडवली आहे. गेल्या 15 वर्षात हा सर्वात मोठा बस अपघात असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लोक गंभीर आणि 26 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहे. हा अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला? याचा तपास सुरू झाला आहे. मात्र या घटनेने अनेकांचे घर उद्ध्वस्त केली आहेत. तर अनेकांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले आहे.
दरम्यान भंडारा तालुक्यातील दोन दाम्पत्यांचा गोंदियाचा शिवशाहीचा प्रवास शेवटचा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे. राजेश देवराम लांजेवार आणि मंगला राजेश लांजेवार (रा. पिपरी) तसेच रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे (रा. चांदोरी) अशी त्यांची नावे आहेत. साकोली तालुक्यातील चांदोरी येथील मूळ रहिवासी असलेले रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे यांची विवाहित मुलगी गोंदिया येथे राहत असून ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी कनोजे दाम्पत्याने साकोली येथून शिवशाही पकडली होती. याचदरम्यान त्यांच्यावर काळाने झडप घातली अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा
तर या अपघातात दुसरे दाम्पत्य भंडारा तालुक्यातील पिपरी येथील आहे. राजेश देवराम लांजेवार (वय ३८) व मंगला राजेश लांजेवार (३०) यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षीय मुलगा रियांशू प्रवास करत होता. अपघातात राजेश व मंगला यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकला रियांशू जखमी झाला. त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लग्नकार्यासाठी गेलेले कुटुंब झाले बस अपघातात उद्ध्वस्त
दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले पालकत्व गमावले आहे. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सय्यद कुटुंब हे एका लग्नाकार्यासाठी साकोली येथे गेले होते. लग्न कार्य उरकून ते साकोली वरून शिवशाही बसचा प्रवास करीत आपल्या गोरेगाव घोटी या गावाकडे येण्यासाठी निघाले. पण या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला अजगर अली सय्यद आणि आरेफा अजगर अली सय्यद या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच अपघातात मृतक अजगर अली यांचा एकुलता एक मुलगा व आई जखमी झाले आहेत. तर अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा अत्तर अली अली हा पोरका झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी आज सय्यद कुटुंबीयांना भेट देत त्यांचे सांत्वन केले.
हे ही वाचा