Sanjay Dutt : संजय दत्त हे नाव आजही बॉलिवुडमध्ये तेवढ्याच आदबीने घेतलं जातं. खलनायक, वास्तव यासारख्या चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारून संजय दत्त यांनी अभिनयाची उंची काय असते ते दाखवून दिलेलं आहे. आजही ते अनेक चित्रपटात भूमिका साकारताना दिसतात. केजीएफ-2 या चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका तर सिनेरसिकांना फारच आवडली. दरम्यान, संजय दत्त हे अभिनेते असले तरी भूतकाळात ते एका प्रकरणामुळे चांगलेच वादात सापडले होते. त्या प्रकरणामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. याच तुरुंगवासातल्या दिवसांबद्दल संजय दत्त यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यांनी तरुंगात काढलेल्या दिवसांची कहाणी ऐकूण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहणार नाही.
1981 सालापासून करिअरला सुरुवात
संदय दत्त हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. संजय दत्त हे वडील सुनील दत्त आणि आई नरगीस दत्त यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 1971 साली त्यांनी रेशमा और शेरा या चित्रपटात बालकलाकार म्हणून पहिल्यांदा भूमिका केली होती. त्यानंतर 1981 साली त्यांच रॉकी हा सुपरहीट चित्रपट आला. या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या करिअरचा आलेख चढा असला तरी त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढउतार आले.
पाच वर्षे राहावे लागले तुरुंगात
संजय दत्त यांनी साधारण पाच वर्षे तुरुंगात काढलेले आहेत. 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान संजय दत्त यांच्या घरात शस्त्रे सापडल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यता आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एकूण 6 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर संजय दत्त यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात साधारण पाच वर्षे काढली होती.
तुरुंगात बसल्या-बसल्याच झोपावं लागायचं
संजय दत्त यांनी काही दिवसांपूर्वी 'यारों की बात' या एका टीव्ही शोमध्ये तुरुंगातील घावलेल्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. तुरुंगात असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. तुरुंगात असताना संजय दत्त बसूनच झोपी जायचे. यारों की बात या कार्यक्रमात अभिषेक बच्चन याने संजय दत्त बसूनच झोपतात असं सांगितलं. याच कार्यक्रमात साजिद आणि अभिनेता रितेश देशमुखने संजय दत्त यांना यामागचं कारण विचारलं होतं. त्यावर बोलताना संजय दत्त यांनी त्यांनी तुरुंगात घातवलेल्या दिवसांबद्दल सांगितलं.'मी तुरुंगात होतो तेव्हा पाऊस आला की ते पाणी तुरुंगात भरायय. त्यामुळे आम्हाला त्याच तुरुंगात झोपावं लागायचं. परिणामी आम्ही खाली बसूनच झोपी जायचो. अजूनही मला असंच झोपण्याची सवय आहे. ही सवय अद्याप सुटलेली नाही,' असं संजय दत्तने सांगितलं.
दरम्यान, संजय दत्तने तुरुंगात काही दिवस घालवल्यानंतर आता मात्र ते अनेक आघाडीच्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका करताना दिसत आहेत. लवकरच ते आणखी काही मोठ्या चित्रपटांत झळकणार आहेत.
हेही वाचा :
अशी धडाकेबाज कामगिरी, की देशात चर्चा भारी, 25 व्या वर्षी IPS होणाऱ्या अंशिका वर्मा आहेत तरी कोण?