- शेतीमालास प्रतिष्ठा
- शेतीमालाची नेमकी ओळख
- गुणवत्तेची खात्री
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी
कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला GI मानांकन
अमेय राणे, एबीपी माझा | 20 Mar 2017 08:13 AM (IST)
मुंबई : कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता जागतिक व्यासपीठावर पोहोचणार आहे. कारण या उत्पादनांना आता जीआय टॅग मिळाला आहे. जीआय टॅग म्हणजे जिओग्राफीकल इंडिकेशन. हा दर्जा मिळाल्याने त्या गोष्टीच्या गुणवत्तेला जागतिक मान्यता प्राप्त होते. कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला यामुळे फायदा होणार आहे. जीआय मानांकन म्हणजे काय? विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते. भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते. जीआय मानांकनामुळे होणारे फायदे: