Gadchiroli News : गडचिरोली-छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर माओवाद्यांच्या हल्ल्याचा कट पुन्हा एकदा फसला आहे. तेलंगणा पोलिसांना 10 माओवाद्यांना (Maoists) अटक करण्यात यश आलं आहे. या सर्व नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. ही स्फोटके नक्षल संघटनेच्या मोठ्या नेत्याकडे नेली जात होती. छत्तीसगड आणि तेलंगणात राज्यात माओवादी सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र पोलीस आणि सीआरपीएफच्या कारवाईने नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावला आहे. 


याआधी 26 एप्रिल रोजी दंतेवाडा जिल्ह्यात नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यात छत्तीसगड पोलिसांच्या DRG चे 15 जवान आणि एक खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. 


तेलंगणा राज्यातील कोत्तागुडम पोलिसांना आणि सीआरपीएफ जवानांना खबऱ्याकडून मूलकनपल्ली जंगल परिसरात नक्षलवादी संघटना मोठा स्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सीआरपीएफच्या 141 व्या बटालियनच्या जवानांची एक टीम तयार करण्यात आली. त्यानंतर संधी पाहून जंगलात शोधमोहीम राबवून 10 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान 90 बंडल कार्डेक्स, 500 डिटोनेटर्स, एक ट्रॅक्टर, एक बोलेरो वाहन आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.


आरोपींकडून जप्त केलेले मुद्देमाल


1) कार्डेक्स : 90 बंडल


2) डिटोनेटर्स : 500


3) क्र. स्टेक्स : 600 


4) बोलेरो वाहन (Rc. No. TS 24T 8640): 1


5) ट्रॅक्टर (AP 20TA 7313): 1


6) मोटरसायकल : 2 


अटक करण्यात आलेले नक्षली


1) चीज कोटी 10. समैया, 36 वर्षे, मजूर, रा. चालपर्थी गाव, दुग्गोंडी मंडळ, वारंगल जिल्हा


2) अरेपल्ली श्रीकांत, 23 वर्षे, कुली, रा. लक्किनेनिपल्ली गाव, वारंगल जिल्हा, नरसंपेटा मंडल.


3) मेकाला राजू स्म.इल्याह 36 वर्षे, चालक, बोलेरो क्रमांक TS2478640 मालक/चालक, आर/ लिंगपुरम गाव, वारंगल जिल्हा, चेन्नराल गांव, चेन्नराल.


4) टोपणनाव रमेश कुम. इलिया, 28 वर्षे, कुली, रा. कोनापुरम गाव, चेन्नराओपेट मंडळ, वारंगल जिल्हा


5) सल्लापल्ली आरोग्य. दानय्या, 25 वर्षे, ट्रॅक्टर चालक, रा. वारंगल जिल्हा, दुग्गोंडी मंडळ, लक्ष्मीपुरम गाव


अटक केलेल्या सीपीआय-माओवादी पार्टी मिलिशिया सदस्यांचा तपशील:


1) मुसिकी रमेश, 32 वर्षे, ट्रॅक्टर मालक/चालक, रा. छत्तीसगड राज्य, विजापूर जिल्हा, औपल्ली पीएस. गाव भीमाराम


2) संगिती सुरेश कॉ. गंगा, 25 वर्षे, रा. मल्लमपेंटा गाव, औपल्ली पीएस, छत्तीसगड राज्य, विजापूर जिल्हा.  


3) बडिसा लालू, 22 वर्षे, रा. कोथापल्ली गाव, औपल्ली पीएस, छत्तीसगड राज्य, विजापूर जिल्हा


4) सोदी महेश, 20 वर्षे, रा. कोथापल्ली गाव, औपल्ली पीएस, छत्तीसगड राज्य, विजापूर जिल्हा


5) मादिवी चेतू, 21 वर्षे, रा.  कोथापल्ली गाव, औपल्ली पीएस, छत्तीसगड राज्य, विजापूर जिल्हा


हेही वाचा


Gadchiroli News:  गडचिरोली: चकमकीत 3 नक्षलवादी ठार; गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी