गडचिरोली :  गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police)   आणि माओवाद्यांमध्ये (Naxal)  झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. माओवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर माओवादी आणि पोलिसांमध्य तब्बल सहा तास चकमक झाली. या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकानं छत्तीसगड सीमेजवळच्या वांडोली गावात माओवाद्यांना कंठस्नान घातलं.  या चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत. त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीला उपचारासाठी पाठवण्यात आलंय. अद्यापही झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सर्च ऑपरेशन सुरुच आहे. या चकमकीनंतर गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि इतर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेचा  थरार सांगितला आहे. 


गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले,  खात्रीलायक सूत्रांकडून  माहिती मिळाली होती की,  वंडाली गावाजवळ काही नक्षलवादी कॅम्प करून थांबले आहेत. येणाऱ्या नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने ते काही मोठी घटनेच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यामुळे लगेच C 60 चे 200 जवान असलेले पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संबंधित क्षेत्रात पाठवण्यात आले. त्यासाठी C-60 च्या पथकाने पाच पाण्याने भरलेले नाले पार केले.  त्यानंतर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले.


घटनास्थळी नेमके काय घडले?


निलोत्पल म्हणाले,  पाच पाण्याने भरलेले नाले पार  केल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले.   सहा तास एन्काऊंटर चालले.  पोलिसांनी 2000 राऊंड फायर केले. अंधाराचा फायदा घेऊन नक्षलवादी पळाले. 12 नक्षली ठार झाले आहे. त्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला आहेत. मोठ्या संख्येने हत्यार ही जप्त केले आहे. 11 हत्यार जप्त केली आहेत. 12 ठार झालेल्या नक्षलींपैकी सर्व अनुभवी आणि महत्वाच्या पदावरील नक्षली होते.  त्यामध्ये 3 divisional कमिटी मेंबर आहे. 4 एरिया कमिटी मेंबर आणि 5 प्लाटून मेंबर आहे. या सर्वांवर मिळून 86 लाख रुपयांचे बक्षीस होते.


12 नक्षल कॅडरचे मोठे नेते ठार, ओळख पटली


1. DVCM योगेश तुलावी, चातगाव कसनसूर दलम प्रमुख
 2. DVCM विशाल ऊर्फ लक्ष्मण आत्राम, कोरची/ टिपागड दलम प्रमुख
 3. DVCM प्रमोद कचलामी, टिपागड दलम प्रमुख
 4. महारू गावडे, चातगाव कसनसूर दलमचे उप कमांडर
 5. अनिल दरो, टिपागड कोरचीचे उप कमांडर
 6. बिजू, चातगाव कसनसूर दलम सदस्य
 7. सरिता परसा, चातगाव/कसनसूर दलम सदस्य
 8. राजो,  चातगाव कसनसूर सदस्य
 9. सागर,  कोरची दलम सदस्य
 10. चांदा, कोरची टिपागड दलम सदस्य
 11 सीता हॉके,  कोरची टिपागड दलम सदस्य
 12 सागर, कोरची टिपागड दलम सदस्य


उत्तर गडचिरोलीमध्ये एकही सशस्त्र नक्षलवादी उरला नाही,  गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल


टीपागड दलम आणि चारगाव कसनसूर दलम पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे. त्यामुळे उत्तर गडचिरोलीमध्ये एक ही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही. मर्दिनटोला एन्काऊंटर दलमनंतर सर्वात मोठे एन्काऊंटर आहे..कालच्या एन्काऊंटर मध्ये तीन पोलीस जखमी झाले आहे, त्यामध्ये एक अधिकारी आणि दोन जवान आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे .  काल गडचिरोली मध्ये vip movement होती.  मात्र त्याच्याशी नक्षलींच्या एकत्रिकरणाचा काही ही संबंध नाही.मात्र कालची घटना म्हणजे vip movment असो किंवा मोठे कार्यक्रम, ते सुरू असताना ही गडचिरोली पोलीस कायदा सुव्यवस्था सांभाळू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे  निलोत्पल म्हणाले.  


हे ही वाचा :


Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार