OTT Release This Week : ओटीटीवर (OTT) प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना 'दिल्ली क्राइम 2' पासून 'क्रिमिनल जस्टिस 3' पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमे पाहायला मिळणार आहेत. 


महारानी 2 (Maharani 2)
कधी होणार प्रदर्शित? 25 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? सोनी लिव्ह


'महारानी 2' (Maharani 2) ही वेबसीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 25 ऑगस्टला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज बिहारच्या राजकारणावर भाष्य करणारी आहे. हुमा कुरैशी या सीरिजमध्ये रानी भारतीच्या भूमिकेत दिसणार आहे. सुभाष कुमार दिग्दर्शित या सीरिजमध्ये अमित सियाल, विनीत कुमार आणि इनामुल हक महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


टॉप गन मेवरिक (Top Gun Meverick) 
कधी होणार प्रदर्शित? 24 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? प्राइम व्हिडीओ


हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजचा 'टॉप गन मेवरिक' (Top Gun Meverick) हा सिनेमा 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. 


क्रिमिनल जस्टिस 3 (Criminal Justice 3)
कधी होणार प्रदर्शित? 26 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार


'क्रिमिनल जस्टिस'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आता तिसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असून तो माधव त्रिपाठीच्या भूमिकेत दिसत आहे. तिसऱ्या सीझनमध्ये पंकजसह श्वेता बसु प्रसाददेखील दिसणार आहे. 






दिल्ली क्राइम 2 (Delhi Crime 2)
कधी होणार प्रदर्शित? 26 ऑगस्ट
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स


'दिल्ली क्राइम'चा दुसरा सीझन प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये शेफाली शाह पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या वेबसीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Boyz 3 : तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला...; 'बॉईज 3' सिनेमाचा ट्रेलर आऊट


Modi Ji Ki Beti : न पाहिलेली... न ऐकलेली घटना जाणून घ्या मोदींच्या लेकीकडून; 'मोदी जी की बेटी' सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट